आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Then And Now: Photos मध्ये पाहा 150 वर्षांपूर्वी कशा दिसेत होत्या एतिहासिक इमारती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर हवा महाल 1880 मध्ये (डावीकडे) आणि आता वर्तमानात (उजवीकडे) - Divya Marathi
जयपूर हवा महाल 1880 मध्ये (डावीकडे) आणि आता वर्तमानात (उजवीकडे)
जयपूर/ नवी दिल्ली - 18 एप्रिल रोजी भारतासह जगभर वर्ल्ड हेरिटेज डे साजरा करण्यात आला. भारतातही अनेक स्मारके अशी आहेत ज्यांचा यूनिस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश आहे. ही स्मारके भारतीय स्थापत्यशैलीचा अजोड नमुना आहेत. हेरिटेज डे निमीत्त divyamarathi.com 19 व्या शतकांपासून आतापर्यंतचे या ऐतिहासिक वास्तूंचे फोटो आणि माहिती घेऊन आले आहे. आम्ही जे फोटो दाखवणार आहोत ते भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचे आहेत. 19 व्या शतकात ही वारसास्थळे कशी दिसत होती आणि आता ती कशी दिसतात हे तुम्हाला या पॅकेजमधून पाहाता येईल.
कुठे आहे पॅलेस ऑफ विंड अर्थात हवा महल
- पॅलेस ऑफ विंड अर्थात हवा महलची निर्मीती जयपूरमध्ये (राजस्थान) 1799 मध्ये महाराज सवाई प्रतापसिंह यांनी केली होती.
- महाराजांनी त्यांच्या राण्यांसाठी तयार केलेल्या या महालात 953 खिडक्या आहेत.
- या महालाची निर्मीती काही विशिष्ट प्रसंगी राण्यांच्या बैठकीसाठी केली होती. येथे बसून राज घराण्याच्या महिला सर्वांच्या नजरेपासून दूर राहून रॉयल इव्हेंटचा आनंद घेत होत्या.
- महालाचा अराखडा असा तयार करण्यात आला होता जणू काही तो श्रीकृष्णाचा मुकूट भासावा.
- महाल पाच मजली असला तरी त्यात जास्त पायऱ्या नाहीत. त्याऐवजी उतार करण्यात आले आहेत.
- इमारतीच्या मध्यभागी मोठी मोकळी जागा आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारतातील काही ऐतिहासिक स्थळे तेव्हा कशी दिसत होती आणि आता कशी दिसतात.