आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जा आव्हान : भारतीय खासदारांनी केली अमेरिकेतील तज्ज्ञांशी चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या आठवड्यात भारतातील खासदारांच्या शिष्टमंडळाने अमेरिकेतील जगप्रसिद्ध शिकागो विद्यापीठाला भेट दिली. त्याशिवाय देशातील ऊर्जाविषयक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी या भेटीत तज्ज्ञांशी चर्चादेखील करण्यात आली.  

देशातील सहा राज्यांतील खासदार या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान हे खासदार अमेरिका भेटीवर होते. भारताच्या ऊर्जाविषयक गरजा आणि आव्हाने यासंबंधी अामदारांनी तज्ज्ञांशी विचारविनिमय केला. जागतिक ऊर्जा आव्हाने, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, माफक उपलब्धता, सामाजिक नुकसानाची शक्यता इत्यादी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदारांनी बिझनेस स्कूल, हॅरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीलादेखील भेट दिली. हा खरोखरच चांगला अनुभव राहिला. धोरणकर्ते आणि सरकार म्हणून या अभ्यास दौऱ्याचा निश्चितपणे उपयोग होईल, असा विश्वास खासदार कालिकेश एन सिंह देव यांनी व्यक्त केला आहे.  

या खासदारांचा समावेश 
रिती पाठक, राकेश सिंह, संजय जयस्वाल (भाजप), कालिकेश एन. सिंह देव, प्रभास कुमार सिंह (बिजू जनता दल), विन्सेंट पाला (काँग्रेस), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी), विवेक गुप्ता (तृणमूल काँग्रेस).  
बातम्या आणखी आहेत...