आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन मुजाहिदीनच्‍या या दहशतद्यांवर एनआयएने ठेवले 5-10 लाखांचे बक्षीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्‍या 5 फरार दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून त्‍यांची माहिती देणा-यांना 5-10 लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्‍याची घोषणा केली आहे. या दहशतवाद्यांच्‍या यादीत बुद्धगया आणि पाटणा येथील साखळी बॉम्‍बस्‍फोटांमधील आरोपी तहसीन अख्‍तरचाही समावेश आहे. मुळच्‍या बिहारच्‍या तहसीन अख्‍तर उर्फ मोनू याच्‍याशिवाय झारखंडमधील हैदर अली उर्फ अब्‍दुल्‍ला, नोमान अन्‍सारी, तौफिक अन्‍सारी आणि मुजीबुल्‍ला यांचा समावेश आहे.

एनआयएकडून करण्‍यात आलेल्‍या घोषणेत सर्वसामान्‍य जनतेला मदतीचे आवाहन करण्‍यात आले आहे. एनआयएतर्फे सांगण्‍यात आले आहे, की इंडियन मुजाहिदीनच्‍या या 5 संशयितांना अटक करण्‍यासाठी माहिती द्यावी. बुद्धगया येथे 7 जुलै आणि 27 ऑक्‍टोबरला पाटणा येथील साखळी बॉम्‍बस्‍फोटांसह इतर अनेक दहशतवादी कृत्‍यांमध्‍ये हे सर्वजण गुंतले आहेत. तहसीन अख्‍तर आणि हैदर अली यांची माहिती देणा-यांना 10 लाख रुपये देण्‍यात येतील. तर इतरांसाठी 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्‍यात आले आहे.

कोण आहेत हे दहशतवादी? जाणून घ्‍या पुढील स्‍लाईड्सवर...