आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Mujahideen Terrorist Yasin Bhatkal Arrested By Nia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यासिन भटकळ \'एनआयए\'कडून जेरबंद, बिहार पोलिसांकडून चौकशी सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- इंडियन मुजाहिदीनचा मास्‍टरमाईंड आणि संस्‍थापक यासिन भटकळला बेड्या ठोकण्‍यात भारतीय तपास यंत्रणांना यश आले आहे. यासिन भटकळला राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) नेपाळमधुन अटक केली. त्‍याला नवी दिल्‍लीत आणण्‍यात येत आहे. काही दिवसांपूर्वी कुख्‍यात दहशतवादी अब्‍दुल करीम टुंडा याला अटक केल्‍यानंतर भटकळला जेरबंद करुन एनआयएने मोठे यश मिळविले आहे. भटकळवर देशातील अनेक बॉम्‍बस्‍फोट घडविल्‍याचा आरोप आहे.

एनआयएने भटकळला अटक केल्‍याची माहिती पंतप्रधान मनमोहनसिंग यांना दिली आहे. दिल्‍लीतल जामा मशिदी बॉम्‍बस्‍फोट, पुण्‍यातील जर्मन बेकरी बॉम्‍बस्‍फोट, 2008 अहमदाबाद बॉम्‍बस्‍फोट 2010 वाराणसी बॉम्‍बस्‍फोट, 2013 हैदराबाद आणि बंगळुरु येथील बॉम्‍बस्‍फोटांचे कट भटकळने रचले होते. यासिन भटकळने पोलिसांना गुंगारा देऊन अनेकदा पळ काढला. परंतु, अखेर त्‍याला अटक करण्‍यात आली.

यासिन भटकळ सध्‍या बिहार पोलिसांच्‍या ताब्‍यात असून त्‍यांच्‍याकडून त्‍याची चौकशी करण्‍यात येत असल्‍याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. याशिवाय इतर माहिती देण्‍यास त्‍यांनी नकार दिला.

भटकळवर देशभरात 10 पेक्षा जास्‍त बॉम्‍बस्‍फोटांचा कट रचल्‍याचा आरोप आहे. तो 12 राज्‍याील पोलिसांना हवा होता. एनआयएने त्‍याच्‍यावर 10 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. भटकळ मूळचा कर्नाटक राज्‍यातील भटकळ गावचा रहिवासी आहे. त्‍याचे खरे नाव अहमद सिद्दीबाप्‍पा आहे. देशभरात इंडियन मुजाहिदीनचे नेटवर्क तो आणि त्‍याचा भाऊ रियाझ याने उभारले. रियाझला भेटण्‍यासाठी तो नेपाळला गेला होता. तिथेच त्‍याला बेड्या ठोकण्‍यात आल्‍याची माहिती आहे. मोहम्‍मद असद नावाने त्‍याने पासपोर्ट बनवला होता. त्‍याचाच वापर करुन तो नेपाळला जात होता. दिल्‍लीत त्‍याचे सासर असून अनेक वर्षे तो तिथे वास्‍तव्‍यास होता.


आणखी वाचा....

दहशतवादी टुंडाला खायचीये जामा मशिद परिसरातील मोगलाई बिर्याणी
न्यायालयाच्या आवारात देशद्रोही अब्दुल करीम टुंडाला चोपले
‘आयएसआय’शी होता अतिरेकी टुंडाचा संपर्क, 1995 मध्ये झाली होती हमीद गुल यांची भेट
मशिदी म्हणजे दहशतवादी केंद्रे, प्रत्येक इमामावर न्यूयॉर्क पोलिसांची हेरगिरी
पुण्यात साखळी ब्लास्ट होत असताना इंटरनेट चॅटिंग करत होते दहशतवादी!