आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी म्हणाले- देशात अच्छे दिन काँग्रेसच आणू शकते, BJP ने देशाला कमकूवत केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाला अच्छे दिन काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच मिळणार - राहुल गांधी . - Divya Marathi
देशाला अच्छे दिन काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच मिळणार - राहुल गांधी .
नवी दिल्ली - जगभरात भारताच्या पंतप्रधानांचे हसे झाले आहे. त्यांची खिल्ली उडवली जात आहे. देशाला 16 वर्षे मागे घेऊन जाणारा नोटबंदीचा निर्णय एका व्यक्तीने घेतला, ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. अशा शब्दात पंतप्रधानांवर निशाणा साधत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी देशाला अच्छे दिन फक्त काँग्रेस देऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे बुधवारी काँग्रेसने केंद्र सरकारच्या जन-विरोधी धोरणाविरोधात जन-वेदना संमेलन आयोजित केले होते. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते. 

मोदींच्या सर्व योजनाची उडवली खिल्ली 
अडीच वर्षांपूर्वी मोदी आले आणि सर्वांच्या हातात झाडू दिला. म्हणाले, भारत स्वच्छ करायचा. फॅशन होती, पहिले तीन-चार दिवस चालली, नंतर स्वच्छता अभियान बंद पडले. मग मेक इन इंडिया, योग, स्किल इंडिया सारख्या योजना आणल्या. आणि अखेरीस घेऊन आले नोटबंदीची योजना. 
 
#1 मोदी आणि भागवतांवर निशाणा 
राहुल गांधी म्हणाले, अख्खा देश मोदी आणि मोहन भागवत चालवत आहेत. या व्यक्ती केंद्री राजकारणाला काँग्रेसचा विरोध आहे. 
राहुल यांनी नोटबंदीवरुन मोदींवर हल्लाबोल केला. नोटबंदीच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले, त्यांनी जे केले त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही लोक काहीच नाही. मला जे वाटेल, ते मी करणार. एवढा मोठा देश आता फक्त नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत चालवत आहेत. 
 
#2 पत्रकारही दबावात 
पत्रकार देखिल दबावात असल्याचे सांगत राहुल म्हणाले, 'मनमोहनसिंग-चिदंबरम यांच्या कालात मीडिया खूप बोलत होता. आता पत्रकार मित्र हळूच सांगतात, ते म्हणतात- नोकरी जाण्याची भीती आहे. फोन येऊ शकतो. तुम्ही समजू शकता.'
 
#3 देशातील संविधानात्मक संस्था कमकूवत केल्या 
- राहुल गांधी म्हणाले, 'आम्ही 70 वर्षात जे केले नाही ते मोदींनी अडीच वर्षांच्या काळात केले. आम्ही संविधानात्मक संस्थाचे स्वायत्त जपले, त्यांचा सन्मान राखला. आरबीआय, न्यायसंस्था, प्रेस यांचा आदर केला. मोदींनी अडीच वर्षांत हे सर्व बंद करुन टाकले.'   
 
#4 मोदींना पद्मासन येत नाही
- मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, माझा योगासनांचा फार अभ्यास नाही. परंतू मी निरीक्षण चांगले करु शकतो. 
- मोदींनी योगासन केले, परंतू ते पद्मासन करु शकले नाही. 
- 'मला योग शिकविणाऱ्या गुरुंनी सांगितले, ज्यांना योगासन जमते त्यांना पद्मासन येतेच आणि ज्यांना पद्मासन येत नाही ते योग करु शकत नाही.'   
- विशेष म्हणजे, मोदींनी मंगळवारी सकाळी ट्विट केले होते की मी आज योग करु शकलो नाही. त्यानंतर सर्व माध्यमात बातम्या होत्या, मोदी रोज योग करतात. 
 
#5 नोटबंदीवरुन जगभरात पंतप्रधानांची खिल्ली 
- देशाच्या पंतप्रधानांची जगभरात खिल्ली उडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपला देश बलिदानासाठी ओळखला जातो. आजपर्यंत भाजपच्या कोणत्या लोकांनी देशासाठी बलिदान दिले. 
- नोटबंदीवरुन जगात पंतप्रधानांचे हसे झाले आहे. तो निर्णय त्यांनी एकट्याने घेतला होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काँग्रेसचे कोण-कोण नेते संमेलनाला उपस्थित होते... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)