आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian National Shooter Tara Sahdev Betray By Husband

नॅशनल शुटरचा आरोप, धर्म परिवर्तनास नकार दिल्याने पतीने अंगावर कुत्रे सोडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (झारखंड) - राष्ट्रीय शुटर तारा शाहदेव हिने पती धर्मपरिवर्तनासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप केला आहे. ताराचे म्हणणे आहे, की तिच्या पतीने स्वतःला हिंदू असल्याचे सांगून लग्न केले आणि धोका दिला आहे. लग्नानंतर तो ताराला मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकत होता. त्याने ताराचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तिने सांगितले आहे. धर्म परिवर्तनासाठी ताराला बेदम मारहाण होत होती, तिच्यावर कुत्रे देखील सोडले जात होते. ताराचा आरोप आहे, की तिच्या पतीने कित्येक दिवस तिला कोंडून ठेवले आणि जेवण देखील दिले नाही.
काय आहे प्रकरण ?
राष्ट्रीय शुटर असलेलती तारा शाहदेवने पती रंजीत कुमार कोहलीवर टोपणनाव धारण करुन लग्न केल्याचा आरोप केला आहे. तिचा आरोप आहे, की रंजीतचे खरे नाव रकीबुल हसन आहे. ताराने शुक्रवारी सहायक पोलिस अधिक्षकांसमोर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. तिने सांगितले, ती होटवार येथे शुटींगच्या सरावासाठी जात होती. तिथे पिवळा दिवा असलेल्या कारमध्ये व्हिजिलेन्स रजिस्ट्रार मुश्ताक अहमद, धनबादचे डीएसपी, गढवाचे एसपी सुजीत सिंह आणि रंजीत कुमार कोहली उर्फ रकीबुल हसन तिचा सराव पाहाण्यासाठी येत होते. या दरम्यान या अधिकार्‍यांनी आणि रंजीतने तिच्या सहकार्‍यांसोबत बातचीत सुरु केली. ताराच्या दोन मित्रांसोबत त्यांची चांगलीच मैत्री जमली.
14 जून रोजी रंजीतने तिला घरी डिनरचे आमंत्रण दिले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 15 जून रोजी तारा मुश्ताक अहमद यांच्या निमंत्रणावरुन त्यांच्याकडे डिनरसाठी गेली. तिथे रंजीत आधीच उपस्थित होता. त्याने तिथे ताराला अंगठी आणि कंगन भेट देत लग्नाची मागणी घातली. 20 जून रोजी मुश्ताकच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाला आणि सात जुलै रोजी त्यांनी लग्न केले.
असा झाला खुलासा
तारा म्हणाली, सासरी असताना एका दिवशी मंत्री हाजी हुसेन यांच्यांकडून इफ्तारचे निमंत्रण आले. त्या निमंत्रण पत्रिकेवर जनाब रकीबुल हसन खान असा उल्लेख होता. ही निमंत्रण पत्रिका ताराने कोर्टात सादर केली आहे. एक दिवस रंजीत 20-25 हाजींना घेऊन घरी आला आणि तारावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकू लागला. तेव्हा पासून दोघांमध्ये वादाला सुरवात झाली. ताराने धर्मांतराला विरोध केल्यानंतर तिचा छळ सुरु झाला. दररोज बेदम मारहाण होऊ लागली. कित्येकदा तर तिच्या अंगावर कुत्रे सोडले गेले. त्यानी तिला चावे घेतले.
ताराने सांगितले, की रंजीत उर्फ रकीबुल हसन लग्नानंतर रात्र-रात्रभर बेपत्ता राहात होता. पाहाटे चार वाजता तो घरी येत असे. तो काय काम करतो याचा अजून पत्ता लागलेला नाही. ताराचे म्हणणे आहे, की तिच्या मेंदीचा कार्यक्रम हॉटेल ऑर्किड आणि लग्न समारंभ हॉटेल रेडिसन ब्लू येथे पार पडला. लग्नानंतर हे दोघे ब्लेअर अपार्टमेंटमध्ये राहात होते. ताज्या माहितीनुसार रंजीत उर्फ रकीबुल हसन त्याच्या वृद्ध आईला घेऊन फरार झाला आहे.

छाचाचित्र - झारखंड महिला आयोगाच्या अध्यक्षा महुआ मांझी यांनी तारा शाहदेवची भेट घेऊन विचारपूस केली.