आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौदलात आणखी एक सेक्स स्कँडल उजेडात; पत्नीचे न्यूड फोटो इंटरनेटवर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नौदलातील सहकार्‍यांसोबत संबंध ठेवण्यास बळजबरी केली जात असल्याचा आरोप एका अधिकार्‍याच्या पत्नीने केला आहे. त्यामुळे नौदलात खळबळ उडाली आहे.

महिलेचा पती लेफ्टनंट कमांडर रँकचा (मेजरच्या समकक्ष) आहे. तो जहाज दुरुस्ती विभागात (कर्नाटक) नियुक्त आहे. महिला स्वत: एमबीए आहे. महिलेने मंगळवारी संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांची भेट घेऊन हा गौप्यस्फोट केला आहे. याची चौकशी करण्याचे आश्वासन अँटोनी यांनी दिल्याचे महिलेने म्हटले. मंगळवारी कमांडर परिषदेत प्रकरण उजेडात आले. याबाबत वाच्यता केल्यास न्यूड फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी पतीने दिल्याचा तिचा आरोप आहे.