आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्सिलोना हल्ल्यात रेस्तराँमधील फ्रिजरमध्ये लपली होती भारतीय वंशाची TV अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय वंशाची टीव्ही अॅक्ट्रेस लैला हल्ल्यातून वाचली आहे. - Divya Marathi
भारतीय वंशाची टीव्ही अॅक्ट्रेस लैला हल्ल्यातून वाचली आहे.
लंडन/नवी दिल्ली - स्पेनमधील बार्सिलोना येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान भारतीय वंशाची ब्रिटीश टीव्ही अॅक्ट्रेस लैला राऊसे (46) बालंबाल बचावली आहे. लैला तिच्या 10 वर्षांच्या मुलीसह- इनाज सुटी एन्जॉय करण्यासाठी बार्सिलोनाला गेली होती. हल्ला झाला तेव्हा जीव वाचवण्यासाठी ती एका कॅफेच्या फ्रिजरमध्ये जाऊन लपली होती. हल्ल्या दरम्यान, तिने लाइव्ह ट्विट करुन त्याची माहिती दिली होती. बार्सिलोनामध्ये गुरुवारी झालेल्या बार्सिलोनामधील लास रॅम्बलास येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 14 जण मृत्यूमुखी पडले होते तर 100 हून अधिक जखमी झाले होते. 
 
ट्विटमध्ये काय म्हणाली होती लैला 
- हल्ला झाला तेव्हा लैला एका कॉफी हाऊसमधील फ्रिजरमध्ये जाऊन लपली. तिने पहिले ट्विट केले, 'मी हल्ल्यात फसले आहे. एका रेस्त्राँच्या फ्रिजरमध्ये लपून बसले आहे. हे सर्व अतिशय वेगवान घडले.'
- 'मी येथील सर्वांच्या सुरक्षिततेची प्रार्थना करते. अजून फायरिंगचा आवाज येत आहे. शस्त्रसज्ज पोलिस कोणालातरी शोधत आहेत.'
- रेस्त्राँमधून बाहेर पडल्यानंतर लैलाना सुरक्षित असल्याबद्दल ट्विट केले. 'रेस्त्राँच्या स्टाफने माझ्या सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार. आय लव्ह यू बार्सिलोना.' 
- यानंतर लैलाने बार्सिलोनाच्या आकाशात घिरट्या घेत असलेल्या पोलिस हेलिकॉप्टरचा फोटो ट्विट करुन सर्व काही व्यवस्थित असल्याचा संदेश दिला.
 
कोण आहे लैला राऊसे
- लैलाचे वडील भारतीय आहेत तर, आई मोरक्कोची नागरिक आहे. 1990 मध्ये लैलाने भारतामधील चॅनल व्ही (V) मध्ये व्हिजे म्हणून करिअरला सुरुवात केली होती. 
- ब्रिटीश टेलिव्हिजन शो फुटबॉलर्स वाइव्स आणि हॉल्बी सिटी या शोमधून लैला प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 
5 दहशतवाद्यांना कंठस्नान
- स्पेनमध्ये गुरुवारी 24 तासांत दोन दहशतवादी हल्ले झाले होते. त्यात 13 जण मृत्यूमुखी पडले होते.
- पहिला हल्ला बार्सिलोना येथे झाला. येथे दहशतवाद्यांनी बेदरकार व्हॅन चालवत शेकडो नागरिकांना चिरडले, यात 13 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. 
- यानंतर कॅमब्रिल्स येथे बॉम्ब घेऊन जमावाच्या दिशेने धावत येणाऱ्या 5 दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले, यात एका पोलिसासह 7 जण जखमी झाले. 
- आयएसआयएसचा प्रचार करणारी संस्था अमाकाने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली होती. 
- बेदरकार व्हॅन चालवून निरपराध लोकांचे प्राण घेतल्या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, चिंताग्रस्त नागरिक...
बातम्या आणखी आहेत...