आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian, Pakistani Singers To Come Together At Sufi Music Fest News In Marathi

भारतीय-पाक गायकांचा सुफी कलाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आत्मिक आनंद देणार्‍या सुफी संगीताचा दोनदिवसीय महोत्सव शनिवारी राजधानीत सुरू झाला. भारत-पाकिस्तानातील प्रसिद्ध सुफी गायक या महोत्सवात सहभागी झाले होते. यानिमित्ताने रसिकांना दोन्ही देशांतील सुफी गायकीची पर्वणी मिळाली.

शनिवारी सिंधी-सुफी महोत्सवाला सुरुवात झाली. सिंधी भाषा जिवंत राहावी म्हणून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सिंध प्रांतातून सुफी तत्त्वज्ञान आणि संगीत आणि सिंधी भाषेचा उगम झाला. भारतात सुफी तत्त्वज्ञानाची अतिशय उच्च संस्कृती पाहायला मिळते. सिंधी-सुफी महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. मला महोत्सवात सहभागी करून घेतल्याचा आनंद आहे. भारतात येऊन खूप चांगले वाटले, अशा शब्दांत पाकिस्तानी सुफी गायक तुफैल संजरानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. द्विपक्षीय संबंधाला बळकट करण्यासाठी भारताकडून हे प्रयत्न केले जात आहेत. संगीताला कोणतीही मर्यादा नसते. कोणत्याही सीमा रोखू शकत नाहीत. संगीत प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येकाला जोडण्याचे महत्त्वाचे कार्य करते, असे संजरानी यांनी सांगितले.

कलावंतांचे सादरीकरण
शांती हिरानंद, दुष्यंत आहुजा, उमा लल्ला, घनश्याम वावाणी, साधना भाटिया, काजल चंदिरमाणी, वीणा शृंगी यांनी आपल्या रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

म्युझिक अल्बम प्रकाशित
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुफी रचना असलेल्या म्युझिक अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. पंडित भजन सोपोरी यांनी लिहिलेल्या रचनांवर आधारित ही गाणी आहेत.

दोन्हीकडे समान स्वर
भारत-पाकिस्तान यांच्यात एक समान स्वर दिसून येतो. सुफी संगीताबरोबरच दोन्ही देशांत सुफी संस्कृती व सिंधी भाषेत समानता दिसते. उभय देश सुफीच्या धाग्याने बांधलेले आहेत. भारत, पाकिस्तानला महान संस्कृतीचा वारसा आहे. त्यातही शाह अब्दुल लतीफ, अमीर खुस्रो अशी सुफी कवींची मोठी परंपरा आहे. त्यामुळेच महोत्सवाच्या निमित्ताने या मूल्यांची देवाण-घेवाण होते. -सिंधू मिश्रा, सचिव, सिंधी अकादमी.