नवी दिल्ली - भारताने पहिल्यांदाच LoC पलीकडे जात PoK मध्ये सर्जिकल स्ट्राइक केली. या मोहिमेचे संपूर्ण नियोजन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोभाल यांच्या नेतृत्वात झाले. एवढेच नाही तर या मोहिमेचे पूर्ण मॉनिटिंगरसुद्धा त्यांनीच केली. भारतीय गुप्तचर संस्थेकडून मिळालेले इनपुट त्यांनी आर्मीसोबत शेयर केले होते.
डोभाल यांनी म्यानमारप्रमाणे पूर्ण मोहिमेला केले मॉनिटर
- 4 जून 2015 रोजी मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. यात 18 जवान शहीद झाले होते.
- त्या नंतर डोभाल यांनी आपला नियोजित बंगलादेश दौरा रद्द केला.
- हल्ल्यानंतर डोभाल काही दिवस मणिपूरमध्येच राहिले. त्या ठिकाणी गुप्तचर संस्थेकडून मिळणाऱ्या माहितीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले होते.
- दहशतवादी हे म्यानमारच्या हद्दीत लपून बसलेले आहेत, याची माहिती आर्मीला मिळाली होती. त्या नंतर भारताच्या पॅराकमांडोंनी सीमेपलीकडे जाऊन बंडखोरांचे दोन तळं उद्ध्वस्त केले होते. - यात 100 दहशतवादी ठार झाले होते होते.
कोण आहेत डोभाल?
- 1968 च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अजीत डोभाल यांनी 6 वर्षे पाकिस्तानात गुप्त एजंट म्हणून काम केलेले आहे.
- ते पाकिस्तानात बोलल्या जाणाऱ्या उर्दूसह इतर अनेक देशांच्या भाषा बोलतात.
- एनएसए झाल्यानंतर ते सर्व गुप्तचर संस्थांच्या प्रमुखासोबत दिवसांतून 10 पेक्षा अधिक वेळा बोलतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, डोभाल यांच्याविषयी अधिक माहिती...