आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMW मध्ये सफर करतात नरेंद्र मोदी, पाहा कोणत्या नेत्याकडे आहे कोणती कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - पंतप्रधानांचे अधिकृत वाहन, BMW, इनसेट - नरेंद्र मोदी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारी 64 वा वाढदिवस आहे. मोदी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांची आवडती स्कॉर्पिओ कार मोदी बदलतील का याची चर्चा सुरू झाली होती. पण त्यांची अधिकृत कार BMW हीच असेल हे काही दिवसांत स्पष्ट झाले होते.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना मोदींनी प्रवासासाठी त्यांची आवडती स्कॉर्पिओ कारच निवडली होती. देशभरात प्रचारासाठी त्यांनी त्याचाच वापर केला. पंतप्रधान बनण्यापूर्वीही मोदी यांनी स्कॉर्पिओच वापरली होती. पण पंतप्रधान बनताच मोदींनी BMW कारमध्ये प्रवास सुरू केला.

आवडती स्कॉर्पिओ बदलली
पंतप्रधानपदाची शपथ घेताच मोदींची कार बदलण्यात आली. मोदींची आवडती स्कॉर्पिओ कार गुजरात सरकारचे अधिकृत वाहन आहे. मोदींनी अनेक वर्षे या बुलेटप्रुफ गाडीत प्रवास केला आहे. पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठीही मोदी याच गाडीने आले होते.

पुढे वाचा, सोनियापासून मनमोहनपर्यंत कोणाला आवडते कोणती गाडी