नवी दिल्ली - यमनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे ख्रिश्चन धर्मगुरू टॉम उझहन्नलिल (56) यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. सद्य:स्थितीत ते सुरक्षित असून, त्यांना लवकरच भारतात आणले जाणार आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आधारे एका कॅथोलिक ग्रुपने रविवारी दिली. दरम्यान, सीरिया सरकारने अटक केलेल्या चार भारतीयांना सोडून दिले.
दहशतवाद्यांनी केली होती 15 लोकांची हत्त्या...
> यमनमधील शेख ओस्मान जिल्ह्यातील एडन शहरामधील एका वृद्धाश्रमात 4 मार्च रोजी इसिसच्या ( इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) दहशतवाद्यांनी घुसून अंधाधुंद गोळीबार केला होता.
> यात चार भारतीय नर्ससह 15 जणांचा मृत्यू झाला.
> याच ठिकाणी असलेले राहणारे भारतीय वंशाचे ख्रिश्चन धर्मगुरू टॉम उझहन्नलिल यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.
> त्यानंतर काही दिवसांनी काही नन्सनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक मेसेज अपलोड केला होता, ज्यात टॉम यांना टॉर्चर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते.
> तसेच 'गुड फ्रायडे'ला त्यांची हत्या करण्यात येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.
सुषमा स्वराज यांनी दिला विश्वास
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या अपहरणाला दुजोरा दिला. टॉम उझहन्नलिल यांच्या सुटकेसाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले होते.
प्रसार माध्यमांनी म्हटले होते हत्त्या झाली
> येमेन येथून अपहरण करण्यात आलेले भारतीय ख्रिस्ती धर्मगुरू टॉम उझनालिल यांची इसिसने हत्या केल्याचे वृत्त युरोपमधील विविध वृत्तपत्रांनी सोमवारी प्रसिद्ध केले होते.
> या संदर्भात भारतीय दुतावास, परराष्ट्र मंत्रालय यांनी अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही.
पुढील स्लाइडवर वाचा, सीरियात अटकेत असलेल्या चार भारतीयांना सोडले