आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इंडियन रेल्वे बदलणार रुपडे, मिळतील विमानासारख्या हायटेक सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंडियन रेल्वे लवकरच हायटेक डबे लॉंच करणार आहेत. या डब्यांचे इंटेरिअर अगदी विमानासारखे अत्याधुनिक आहे. या ट्रेनचा प्रत्येक डबा तयार करण्यासाठी सुमारे 14 लाख रुपये खर्च येणार आहे.
काय खास असेल या डब्यांमध्ये
आकर्षक इंटेरिअर डेकोरेशन, आरामदायी आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, बायो-टॉयलेट, वरच्या बर्थवर चढण्यासाठी पॅसेंजर फ्रेंडली शिडी, चमकणारे साइनबोर्ड आदी सुविधा देण्यात येणार आहेत. सुरवातीला असे 20 डबे भारतीय रेल्वेत सामिल करण्यात येणार आहेत. प्रवाशांचा फिडबॅक घेऊन डब्यांची संख्या वाढविली जाणार आहे.
कोठे तयार केले जात आहेत हे डबे
भोपाळमधील इंडियन रेल्वेज कोच रिहॅबिलिटेशन वर्कशॉपमध्ये हे डबे तयार केले जात आहेत. यासंदर्भात पश्चिम-मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रमेशचंद्र यांनी सांगितले, की आम्ही प्रत्येक डब्यावर सुमारे 14 लाख रुपये खर्च केले आहेत. या डब्यांचे इंटेरिअर आणि सुविधा विमानासारख्या आहेत.
111 डबे तयार केले जातील
भोपाळच्या वर्कशॉपमध्ये अशा स्वरुपाचे एकूण 111 डबे तयार करण्याची योजना आहे. सध्या 20 डबे तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानंतर रेल्वे मंडळाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला जाईल.
पुढील स्लाईडवर बघा, भारतीय रेल्वे बदलणार रुपडे... फोटोंच्या माध्यमातून बघा कोणत्या सुविधा मिळतील... असे दिसतील नवीन डबे....
बातम्या आणखी आहेत...