आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railway To Serve Ready To Eat Food In Trains, News In Marathi

आता रेल्वे एक्स्प्रेसमध्ये मिळेल प्री-कुक्ड फूड; या आठवड्यापासून अंमलबजावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रेल्वे गाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्यापासून प्रायोगिक तत्त्वावर प्री-कुक्ड खाद्यपदार्थ देण्याची सुरुवात करणार आहे. दुसरीकडे रेल्वे लवकरच ई-केटरिंगचीही सुविधा सुरू करणार आहे. रेल्वेने यासाठी हल्दीराम आणि आयटीसीसोबत करार केला आहे.

रेल्वे वाहतूक मंडळाचे सदस्य डी.पी.पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रायोगिक तत्त्वांवर 12628/12627 नवी दिल्ली, बंगळुरु, कर्नाटक एक्स्प्रेस, अमृतसर, मुंबई सेंट्रल पश्चिम एक्स्प्रेस तसेच 16501/02 बंगळुरु अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये ही सेवा सुरु करण्‍यात आली आहे. कर्नाटक एक्स्प्रेससाठी एमटीआर, पश्चिम एक्स्प्रेससाठी हल्दीराम आणि बंगळुरु, अहमदाबाद एक्स्प्रेससाठी आयटीसीसोबत प्री-कुक्ड फूडचा पुरवठा करण्‍यासाठी करार करण्‍यात आला आहे.
पांडे म्हणाले, या गाड्यांमधून पेंट्री कारद्वारा दिले जाणारे जेवणही कायम ठेवण्यात आले आहे. प्री कुक्ड फूड अतिरिक्त पर्याय म्हणून उपलब्ध करून ‍देण्यात आला आहे. त्यात जीरा पुलाव, राजमा चावल, मटर पुलाव, रसम चावल, शाकाहारी पदार्थ तसेच चिकन चेट्टीनाड, चिकन बिर्यानी, चिकन दरबारी अशा मांसाहारी पदार्थांचा समावेश असेल.

(संग्रहीत छायाचित्र)

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, जेवण गरम करण्यासाठी रेल्वे एक्स्प्रेसमधील पेंट्रीकारमध्ये उपलब्ध असेल मायक्रोवेव्ह ओव्हन...