आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे तिकीट रद्द करणे होणार महाग, आकारले जाईल दुप्पट शुल्क, जाणून घ्या नवीन नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रेल्वेचे आरक्षित तिकीट रद्द करणे 12 नोव्हेंबरपासून महाग होणार आहे. रेल्वेने कोणत्याही श्रेणीतील कॅन्सलेशन फी दुप्पट केली आहे. आरक्षित तिकीटावर लावण्यात येणारे क्लार्क चार्जही दुप्पट करण्यात आले आहे.
या नियमांमध्ये केले आहेत बदल
- तिकीट रद्द केल्यावर जास्त शुल्क आकारण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे. तिकीट रद्द करण्याचा अवधीही बदलण्यात आला आहे. नवीन नियमांमध्ये सांगण्यात आले आहे, की आता ट्रेन सुटण्याच्या 48 तासांपूर्वीच तिकीट रद्द केले तर प्रति प्रवासी फस्ट एससी आणि एग्झिकेटिव्ह क्लाससाठी 240, सेकंड एसी आणि फस्ट क्लाससाठी 200, थर्ड एसीसाठी 180, स्लीपरसाठी 120 आणि सेकंड क्लाससाठी 60 रुपये कपात केली जाईल.

- क्लर्क चार्ज आता सेकंड क्लाससाठी 30 तर स्लीपर आणि एसी क्लाससाठी 60 रुपये प्रति प्रवासी असेल.

- ट्रेन सुटण्याच्या 48 ते 12 तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केले तर भाड्यात 25 टक्के कपात केली जाईल. तसेच ट्रेन सुटण्याच्या 12 ते 4 तासांपूर्वी रद्द केले तर 50 टक्के कपात केली जाईल. ट्रेन सुटण्याच्या चार तासांपूर्वी रद्द करायचे झाल्यास रिफंड केले जाणार नाही. आरएसी आणि वेटिंग लिस्टच्या तिकीटावर केवळ क्लर्क चार्जमध्ये कपात केली जाईल. पण यातही आता दुप्पट वाढ झाली आहे. तसेच हे तिकीट ट्रेन सुरु झाल्यानंतर केवळ 30 मिनिटांच्या आत रद्द केले जाईल. आधी हा अवधी केवळ दोन तास होता. कोणत्याही श्रेणीतील कमित कमी कपात 48 तासांमध्ये केली जाईल.
दिवाळी निमित्त सोडण्यात येणाऱ्या विशेष ट्रेनची माहिती वाचा, पुढील स्लाईडवर....