आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railways Changed Timing For Booking Tatkal Tickets

तत्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के रक्कम मिळणार रिफंड, वेळेतही बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक वृत्त आहे. ते म्हणजे भारतीय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंग प्रणालीत काही बदल केले आहेत. तत्काळ तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला 50 टक्के रक्कम रिफंड मिळणार आहे. आतापर्यंत तत्काळ तिकीट रद्द केल्यास कोणतेही रिफंड मिळत नव्हते. याशिवाय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगच्या वेळेतही बदल केला आहेत.

नव्या नियमानुसार सकाळी 10 ते 11 पर्यंत एसी कोचसाठी तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे, तर नॉन एसी कोचसाठी 11 ते 12 या काळात तात्काळ तिकीटांची बुकिंग करता येईल. येत्या एक जुलैपासून ही नवी प्रणाली सुरु होणार आहे.

वेबसाइट आणि बुकिंग खिडकीसाठी लागू असेल नवे नियम
तत्काल कोट्यातील तिकिट बुकिंग आधीप्रमाणे सकाळी 10 वाजता सुरु होईल. नव्या व्यवस्थेनुसार फक्त पहिल्या एक तासात (10 ते 11 या वेळेत) फक्त एसी कोचसाठी तत्काळ तिकिट बुक करता येईल. त्यानंतर 11 ते 12 वाजेदरम्यान नॉन एसी कोचसाठी तिकिट बुक करता येईल. रेल्वेचे हे नवे नियम देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या आरक्षण केंद्रांसह आयआरसीटीसीच्या वेबसाइटला देखील लागू राहातील. तत्काल तिकिट प्रवास करण्‍याच्या एक दिवस आधीच बुक करावे लागते.
रेल्वे प्रशासन चालवणार 'तत्काळ विशेष गाडी'
रेल्वे मंडळाचे सदस्य (दळणवळण) अजय शुक्ला यांनी सांगितले की, तत्काळ कोटयात तिकिट घेणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तत्काळ तिकिट मिळण्याच्या वेळेतही बदल करण्‍यात आला आहे.
तत्काळ तिकिट घेण्याच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरच 'तत्काळ स्पेशल गाडी' चालवणार असल्याचे अजय शुल्लका यांनी सांगितले.