आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 जुलैपासून बदलणार हे नियम, आता Online नाही मिळणार वेटिंग तिकीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1 जुलैपासून सुविधा ट्रेन धावणार आहे. या रेल्वेच्या प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळणार नाही. - Divya Marathi
1 जुलैपासून सुविधा ट्रेन धावणार आहे. या रेल्वेच्या प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळणार नाही.
नवी दिल्ली - रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. काही सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमांतर्गत ऑनलाइन बुकिंग करत असल्यास वेटिंग तिकीट मिळणार नाही. त्यासोबतच शताब्दी, राजधानीसारख्या दुसऱ्या गाड्यांचे कोच वाढवण्यात येणार आहे. तत्काळ तिकीट रिझर्व्हेशन रद्द केल्यानंतर आता अर्धी रक्काम कापली जाणार आहे. प्रादेशिक भाषांमध्येही तिकीट मिळेल.

आणखी कोणते बदल होणार रेल्वेत..
- रेल्वेने आधीच घोषणा केली आहे, की 1 जुलैपासून राजधानी, शताब्दी , दुरांतो आणि मेल-एक्स्प्रेस ट्रेनच्या धर्तीवर सुविधा ट्रेन चालणार आहे.
- ही ट्रेन देशातील महत्त्वाच्या मार्गांवर प्रीमियम ट्रेनऐवजी चालवली जाईल.
- ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी वेकअप कॉल डेस्टिनेशन सारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

हे पाच बदल होणार

#1 - सुविधा ट्रेन
- 1 जुलैपासून सुविधा ट्रेन धावणार आहे. या रेल्वेच्या प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळणार नाही. या ट्रेनमध्ये सर्वांना कन्फर्म तिकीट मिळेल. तिकीट रद्द केल्यास फक्त अर्धे पैसे परत मिळेल.

#2- कॅन्सलेशन
- एसी फर्स्ट आणि सेकंडचे तिकीट रद्द केल्यानंतर 100 रुपये अतिरिक्त कापले जातील.
- एसी थर्ड साठी ही रक्कम 90 रुपये आणि स्लिपर कोचचे तिकीट रद्द केल्यास 60 रुपये कापले जातील.

#3 - पेपरलेस तिकीट
- राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेससाठी 1 जुलैपासून पेपरलेस तिकीट मिळेल. या ट्रेनमध्ये मोबाइल तिकीट व्हॅलिड असेल.

#4 - तत्काळ बुकिंग टायमिंग
- 1 जुलैपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल होणार आहे. एसी कोचसाठी तत्काळ तिकीट खिडकी सकाळी 10 ते 11 वाजतापर्यंत उघडी राहिल.
- स्लिपर कोचसाठी सकाळी 11 ते 12 या वेळेत बुकिंग होईल.

#5 - कोच बुकिंग
- रेल्वेच्या नव्या नियमानुसार, कोणतीही व्यक्ती 50 हजार रुपयांमध्ये सात दिवसांसाठी एक कोच बुक करु शकतो.
- तसेच, नऊ लाख रुपयांमध्ये 18 डब्यांची पूर्ण रेल्वे सात दिवसांसाठी बुक करता येणार आहे.
- जर व्यक्ती किंवा संस्थेला 18 पेक्षा जास्त डबे हवे असतील तर प्रत्येक कोचसाठी 50 हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
- सात दिवसांपेक्षा जास्त दिवस ट्रेन बुक करायची असल्यास पुढील प्रत्येक दिवसासाठी प्रतीकोच 10 हजार रुपये द्यावे लागतील.
पुढील स्लाइडमध्ये आता, अनुसूचित जाती-जमाती, अपंग, महिला यांनाही परीक्षा शुल्क..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...