आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परोपकारात भारतीय श्रीमंतांचा हात आखडता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात अब्जाधीशांची संख्या वाढत असली तरी दान-धर्माच्याबाबतीत भारतीय श्रीमंत अजूनही आखडता हात घेत आहेत.
समाजोपयोगी कार्याच्या निधी संकलनासाठी भारतीय उद्योजकांनी स्थापन केलेला रिची-रिच क्लब पाश्चिमात्त्य उद्योजकांच्या क्लबपेक्षा मागे आहे. अमेरिकेतील फोर्ब्ज मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक यादीनुसार भारतामध्ये 55 अब्जाधीश आहेत. किमान एक अब्ज रुपये असणार्‍या नागरिकांच्या संख्येत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र, लोककल्याणकारी कामांमध्ये भारतातील श्रीमंत मागे आहेत. बेन अँड कंपनीने भारतातील परोपकारी सेवावृत्तीवर प्रसिद्ध केलेल्या अहवालात श्रीमंत भारतीयांनी 2011 मध्ये त्यांच्या उत्पन्नातील 3.1 टक्के वाटा समाजासाठी दान केला. 2010 मध्ये त्यांच्याकडून 2.3 टक्के निधी देण्यात आला होता. भारतीय उद्योजकांचा या क्षेत्रातील सहभाग अन्य देशांपेक्षा कमी आहे. श्रीमंत अमेरिकी नागरिक या कामासाठी वार्षिक उत्पन्नातील 9.1 टक्के वाटा देतात.
भारतात स्वयंसेवी संस्थांची काम करण्याची पद्धत आणि अन्य मुद्द्यांमुळे श्रीमंत लोककल्याणकारी कामांसाठी पुढे येत नाहीत. सर्वेक्षणात सहभागी श्रीमंतांनी आगामी पाच वर्षांत आपल्या कमाईतील 20 टक्के वाटा परोपकारी कार्यासाठी दान देणार असल्याचे म्हटले आहे. देशात धार्मिक स्थळांचे बांधकाम आणि विद्यापीठांना निधी देण्याच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला जातो. वैयक्तिक समाजकार्यापेक्षा ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी काम केले जाते. यामध्ये अंबानी, टाटा आणि बिर्ला या उद्योग घराण्यांच्या ट्रस्टचा समावेश आहे.