आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया प्रशांत प्रदेशात ‘बढा रुपय्या’, 2014 मध्ये भारतीय रुपया 5.5 टक्क्यांनी मजबूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विदेशी भांडवलदारांनी वाढवलेला गुंतवणुकीचा ओघ आणि नव्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांमुळे आशिया प्रशांत प्रदेशात रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत आजवरच्या सर्वोत्तम पातळीवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी मूल्य घसरणीचा विक्रम नोंदवणार्‍या रुपयाचे आजघडीचे मूल्य गेल्या अकरा महिन्यांत 58 रुपये 52 पैसे या सर्वोच्च पातळीपर्यंत वाढले आहे. आशिया प्रशांत क्षेत्रात गेल्या अकरा महिन्यांत सर्वोत्तम कामगिरी करणारे चलन ठरले आहे. गेल्या वर्षी 19 जून रोजी रुपया 58. 70 पैसे प्रतिडॉलर असा दर होता. डॉलरच्या तुलनेत अन्य चलनांचे विश्लेषण केले असता 2014 मध्ये रुपया आतापर्यंत 5. 3 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. आशिया प्रशांत क्षेत्रातील इतर चलनांच्या तुलनेत तो सर्वात पुढे आहे. इंडोनेशियाचा रुपया व न्यूझीलंडच्या डॉलरपेक्षाही भारतीय रुपया अधिक वेगाने मजबूत झाला आहे. गेल्या शुक्रवारी रुपया मजबूत होऊन 58.52 प्रति डॉलरवर पोहोचला होता. या वर्षीच्या सुरुवातीला तो 61.80 प्रतिडॉलरवर होता. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत डॉलरच्या तुलनेत रुपया 328 पैशांनी मजबूत झाला आहे.
कोणते चलन किती मजबूत
भारतीय रुपया 5.3 टक्के
इंडोनिशियन रुपया 4.6 टक्के
न्यूझीलंड डॉलर 3.75 टक्के
आॅस्ट्रेलियन डॉलर 3.5 टक्के
जपानी येन, दक्षिण कोरियाई
वॉन, मलेशियन रिंगिट 2.3 टक्के
फिलिपिन्स पीसो 1.6 टक्के
थायलंडचा बात व सिंगापूर
डॉलर 0. 50 टक्के
घसरणीचा धोका कायम
मात्र, काही विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार अलीकडच्या काळात रुपयाचे मूल्य वाढले असले तरीही भारतीय रुपयाच्या मूल्यात कधीही घसरण होऊ शकते. घसरणीचा तो धोका कायम आहे. हाँगकाँग डॉलरच्या किमतीत या वर्षी कोणताही बदल झालेला नाही. तर तैवान डॉलर व चीन युवानचे मूल्यही ही घटले आहे.