आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहे त्या चाकरीवरच भारतीयांचा समाधानाचा ढेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीयांना आपली आहे ती नोकरी बरी वाटते. त्यात त्यांना समाधानाची भावना आहे. म्हणूनच प्रत्येकी पाचपैकी एका भारतीयाला असेच वाटते. एवढेच नाहीतर वेळ पडल्यास त्यासाठी तो मोफत काम करण्यासही तयार होतो, असे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
ऑनलाइन करिअर आणि भरतीच्या क्षेत्रात काम करणा-या माँस्टर वर्ल्डवाइड अँड जीएफके या संस्थेच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला. भारतातील समाधानी नोकरदारांची संख्या खूप अधिक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासात भारताचा क्रमांक कॅनडा, नेदरलँड नंतर तिस-या स्थानी येतो. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, नेदरलँडसह सात देशांतील 8 हजार कर्मचा-यांचा अभ्यास त्यात करण्यात आला. भारतातील पाच टक्के कर्मचा-यांनी मात्र आपल्याला नोकरी आवडत नसल्याचे स्पष्टपणे कबूल केले. परंतु सध्या असलेल्या नोकरीचा तिटकारा येतो, असे मात्र कोणत्याही भारतीय कर्मचा-याने नमूद केले नाही. पैशाने आनंद विकत घेतला जाऊ शकत नाही. मध्यम उत्पन्न गटातील पाचपैकी प्रत्येकी (60 टक्के) तीन कर्मचा-याने आपल्याला नोकरी आवडते किंवा त्यावर आपले प्रेम असल्याचे नमूद केले. उच्च उत्पन्न गटातील कर्मचा-यांच्या तुलनेने (52 टक्के) हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.
नोकरीवर प्रेम करणारे टॉप सेव्हन देश
कॅनडा -64 टक्के, नेदरलँड-57 टक्के, भारत-55 टक्के, अमेरिका-53 टक्के, इंग्लंड-46 टक्के, फ्रान्स-43 टक्के, जर्मनी-35 टक्के
युरोप-अमेरिकेतील लेखकांसाठी भारत नवीन प्रकाशन केंद्र
नवी दिल्ली । युरोप व अमेरिकेतील लेखकांना भारत हे नवीन प्रकाशन केंद्र म्हणून आकर्षित करू लागले आहे. युरोपातील लेखकांनी भारतात पुस्तक प्रकाशित करण्याचा ट्रेंड रुळू लागला आहे. भारतात प्रकाशनाच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक लेखक भारताकडे वळले आहेत. त्यामुळेच अमेरिका, इंग्लंड नंतरचे तिस-या क्रमांकाची मोठी प्रकाशन बाजारपेठ म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.