आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian 'semi bullet Train' Sets New National Speed Record

सेमी बुलेट ट्रेनची चाचणी; दिल्ली-आग्रा 90 मिनीटात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगप्रसिद्ध ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या देश-विदेशील पर्यटकांना भारतीय बुलेट ट्रेन केवळ 90 मिनिटात दिल्लीहून आग्र्याला पोहोचवणार आहे. पहिल्यावहिल्या भारतीय बुलेट ट्रेनची गुरुवारी दिल्लीत चाचणी घेण्यात आली. दहा डब्यांच्या सेमी बुलेट ट्रेनने दिल्ली-आग्रा हे अंतर सुसाट वेगात केवळ 90 मिनिटात पार केले. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार्‍या या रेल्वेगाडीमुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार आहे.

प्रवासात अर्ध्या तासाने घट
दिल्ली -आग्रा हे अंतर पार करण्यासाठी शताब्दी एक्सप्रेस सध्या 120 मिनिटे अर्थात दोन तास घेते. हे अंतर 30 मिनिटांनी घटणार आहे. गुरुवारी सकाळी 11.15 वाजता दिल्ली स्थानकात हिरवी झेंडी दाखवल्यानंतर बुलेट ट्रेन 99 मिनिटांत आग्र्याला पोहोचली. ही गाडी निजामुद्दीन स्थानकातून धावणार असून तिथून केवळ 90 मिनिटेच लागणार आहेत. ही गाडी नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
सेमी बुलेट ट्रेन का ?
बुलेट ट्रेनचा सर्वसाधारण वेग ताशी 300 किलोमीटर असतो. त्यामुळे दीडशे किमी वेगाने धावणारी भारतीय गाडीला सेमी बुलेट ट्रेन म्हटले जाते. गाडीच्या वेगात अडथळा येऊ नये म्हणून 27 किलोमीटर लांबीचे कुंपण टाकण्यात आले आहे.
(फोटो - फरीदाबाद येथील रेल्वे स्थानकातून सुसाट वेगात बाहेर पडताना गुरूवारी सेमी बुलेट ट्रेन)