आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात घुसून मारले २० अतिरेकी, लष्कराचे प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उरी भागात भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बुधवारी भारतीय जवानांनी बदला घेतला. दोन विशेष पथकांनी उरी सेक्टरलगत व्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तीन प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला करून त्यांच्या छावण्या उद््ध्वस्त केल्या. यात सुमारे २० अतिरेकी मारले गेले.

माध्यमांनुसार, या धडक कारवाईत सुमारे २०० अतिरेकी जखमी झाले आहेत. मात्र, या कारवाईला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. लष्करातील सूत्रांनुसार, विशेष कमांडोजनी मंगळवारी रात्री उशिरा हेलिकॉप्टरच्या मदतीने ही कारवाई केली. उरी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आक्रमक होऊ शकतो, याचा अंदाज आल्याने पाकिस्तानने व्याप्त काश्मीरसह गिलगिट-बाल्टिस्तान भाग नो फ्लाइंग झोन जाहीर केला.मात्र, त्यापूर्वीच भारतीय लष्कराने हा हल्ला चढवला. दरम्यान, भारताच्या संभाव्य हल्ल्यामुळे अस्वस्थ असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लष्करप्रमुख रािहल शरीफ यांच्याशी चर्चा केली.

बुधवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याबाबतचे संकेत दिले होते. ‘पंतप्रधान मोदी यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. यावर काहीतरी घडत आहे यावर विश्वास ठेवा. उरी हल्ल्यानंतर तेवढ्याच क्षमतेने प्रत्युत्तर देण्याची गरज आहे,’ असे पर्रीकर म्हणाले होते.
बातम्या आणखी आहेत...