नवी दिल्ली - मानवासाठी कायम कुतूहलाचा विषय ठरलेल्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत येत्या तीन दिवसांत दोन याने प्रवेश करतील. यातील एक भारतीय असून दुसरे अमेरिकेचे आहे. दोन्ही याने गेल्या नोव्हेंबर महिन्यांत प्रक्षेपित करण्यात आली होती.अमेरिकेचे मार्स अॅटमॉस्फिअर अँड व्हॉलेंटाइन इव्होल्युशन (मेव्हन) यान २१ सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत दाखल होईल तर भारताचे यान त्यानंतर तीन दिवसांनी २४ सप्टेंबरला या लाल ग्रहाच्या कक्षेत स्थापित केले जाणार आहे. भारताची मंगळयान मोहीम पहिलीच असल्याने याबद्दल जगभरात कुतूहल आहे. अत्यंत कमी
खर्चात मंगळ ग्रहापर्यंत धडकलेले हे यान यशस्वीरीत्या कक्षेत दाखल झाले तर भारत मंगळावर धडकणा-या पहिल्या पाच देशांच्या रांगेत दाखल होईल.
भारतीय मंगळयान
वजन २५५० किलो
खर्च ४.५ अब्ज रुपये
अमेिरकी मंगळयान
* वजन : १३५० किलो
* खर्च : ६७.१ कोटी डॉलर (सुमारे ४० अब्ज रुपये)
* आठ प्रायोगिक उपकरणे