आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय तबलावादक संदीप दास यांना ग्रॅमी पुरस्कार; अनुष्का यांना ‘ग्रॅमी’ची सहाव्यांदा हुलकावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तबलावादक संदीप दास - Divya Marathi
तबलावादक संदीप दास
लॉस अँजिल्स- भारतीय तबलावादक संदीप दास यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणार्‍या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले आहे. ‘सिंग मी होम’ या गाण्यासाठी जागतिक संगीत प्रकारात दास यांनी ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. प्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांची कन्या अनुष्का यांना मात्र, सहाव्यांदा ग्रॅमी पुरस्काराने हुलकावणी दिली आहे.

‘यो-यो मा’चे ‘सिंग मी होम’ हे गाणे जगभरातील विविध कलाकारांनी संगीतबद्ध केले आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेते यो-यो मा आणि संदीप दास यांच्याव्यतिरिक्त न्यूयॉर्कमधील सिरीयन सनईवादक किनान अझमे यांचाही समावेश आहे. मात्र, अझमे यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या आदेशाचा फटका बसला होता.
 
स्टेपल सेंटरमध्ये झालेल्या 59 व्या ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळ्यात पॉपुलर सिंगर बेयोंसे नोल्स आणि एडेल यांचा दबदबा कायम राहिला. ब्रिटिश सिंगर एडेल याने 3 तर बेयोंसे याने दोन प्रकारात पुरस्कार पटकावला आहे.

एडेल याने पटकावला 'सॉन्ग ऑफ द ईयर'चा पुरस्कार...
- सॉन्ग ऑफ दी ईयर : हेलो (एडेल)
- बेस्ट रॅप अल्बम : चान्स द रॅपर (कलरिंग बुक)
- बेस्ट अर्बन कंटेम्पररी अल्बम : लेमोनेड (बेयोंस)
- बेस्ट कंट्री सोलो परफॉर्मन्स : माई चर्च (मरेन मोरिस)
- बेस्ट रॉक सॉन्ग :ब्लॅकस्टार (डेव्हिड बाउल) 
- बेस्ट पॉप ड्यू/ग्रुप परफॉर्मन्स : स्ट्रेस्ड आउट (ट्वेंटी वन पायलट्स)
- बेस्ट न्यू आर्टिस्ट : चान्स द रॅपर
- बेस्ट पॉप वोकल अल्बम :एडेल
- बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स :एडेल

पुढील स्लाइडवर वाचा, अनुष्का शंकर यांना ग्रॅमी पुरस्काराने दिली यंदाही हुलकावणी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...