आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनकडून कुरापती : लडाखमध्ये 2 वेळा घुसखोरीचा प्रयत्न, भारताने दिले चोख प्रत्युत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिंगर 4 आणि फिंगर 5 या ठिकाणी चिनी सैन्याने 2 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. - Divya Marathi
फिंगर 4 आणि फिंगर 5 या ठिकाणी चिनी सैन्याने 2 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
लेह/नवी दिल्ली- सिक्कीमजवळील डोकलाम येथील वादानंतर चीनने लडाख सीमेवरही भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. लडाखमधील पँगाँग सरोवराच्या किनाऱ्यावरील फिंगर 4 आणि फिंगर 5 या ठिकाणी चिनी सैन्याने 2 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा भारतीय सैन्याने तो हाणून पाडला.
 
भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन्ही बाजूंकडील काही सैनिक जखमी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...