आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Vice President Polls Venkaiah Naidu Vs Gopalkrishna Gandhi, VP Election Results Live Updates

नायडूंचा 25 वर्षांत सर्वाधिक मतफरकाने विजय, 20 वर्षांनंतर दक्षिण भारतातून उपराष्ट्रपती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. या निवडणुकीत ७८५ पैकी ७७१ म्हणजे ९८.२% खासदारांनी मतदान केले. उपराष्ट्रपती निवडणुकीत आजवरचे हे सर्वाधिक मतदान आहे. नायडूंना ५१६ खासदारांची तर प्रतिस्पर्धी गोपालकृष्ण गांधी २४४ मते मिळाली. गांधींपेक्षा नायडूंची मते दुप्पट आहेत.
 
गेल्या २५ वर्षांतील मतफरकाचा विचार करता हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी १९९२ मध्ये के. आर. नारायणन यांना ७०१ पैकी ७०० मते मिळाली होती. नायडू देशाचे १५वे उपराष्ट्रपती असले तरी या पदावर विराजमान होत असलेले १३वे नेते आहेत. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि हमीद अन्सारी दोन-दोन वेळा या पदावर होते. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला समाप्त होत आहे. व्यंकय्या नायडू ११ ऑगस्टला शपथ घेतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून व्यंकय्यांचे अभिनंदन केले.
 
चारही सर्वोच्च घटनात्मक पदे भाजपकडे
गेल्या ७० वर्षांत प्रथमच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन अशा देशातील सर्वोच्च चार पदांवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नेते आहेत.
 
२० वर्षांनी पुन्हा दक्षिणेतून निवडले गेले उपराष्ट्रपती
आजवर द. भारतातून ७ उपराष्ट्रपती निवडले गेले. नायडू सातवे आहेत. त्यांच्याआधी के.आर. नारायणन १९९२ ते १९९७ पर्यंत उपराष्ट्रपती होते. दक्षिणेचेच राधाकृष्णन, झाकीर हुसेन, व्ही.व्ही. गिरी, बी.डी. जत्ती, व्यंकटरमण हेही उपराष्ट्रपती राहिलेले आहेत. 
 
१४ खासदारांनी मतदान केले नाही, ११ मते रद्द झाली, १ भाजप खासदार मत टाकू शकले नाहीत
एकूण मतदार - 785
मतदान झाले - 771
मते रद्द झाली - 11
व्यंकय्या नायडू - 516
जी.के. गांधी - 244
 
- दोन्ही सभागृहांत ७९० खासदार आहेत. न्यायिक आदेशामुळे भाजपचे छेदी पासवान मतदान करू शकले नाहीत. रद्द ११ मतांमध्ये गांधींच्या बाजूने ७ तर नायडूंच्या बाजूने ४ मते होती.
 
जदयू-बीजदसोबत कोविंद यांना ५२२ मते, त्यांच्याशिवाय व्यंकय्यांना ५१६
नायडूंना सुमारे ३४ खासदारांनी पक्षाबाहेर जाऊन मत दिले. राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना ५२२ खासदारांनी मतदान केले. त्यांना जदयू व बीजदचा पाठिंबा मिळाला होता. या दोन्ही पक्षांचे ४० खासदार आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत हे पक्ष गांधी यांच्यासोबत होते. अशात नायडूंना ४८२ मते मिळायला हवी होती. मात्र, ती ५१६ मिळाली. याचाच अर्थ अपेक्षेपेक्षा ३४ खासदारांची मते जास्त मिळाली. दोन्ही निवडणुकांतील बाद मतांचा यात समावेश नाही. पक्ष क्रॉस व्होटिंगचा अंदाज बांधत आहेत.
बातम्या आणखी आहेत...