आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी गेला होता नोकरी करायला, एका रात्रीतून झाला कोट्यधीश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केरळमध्ये राहणारी ही व्यक्ती श्रीराज कृष्णन कोप्परेमिब्ल मागील नऊ वर्षांपासून आबू-धाबीमध्ये एका शिपिंग कंपनीत नोकरी करत आहे. प्रत्येक महिन्याला कंपनीकडून 6 दिरहम म्हणजेच 1 लाख 9 हजार रुपये पगार मिळतो. श्रीराज कृष्णन ही व्यक्ती नेहमी लॉटरीचे तिकीट खरेदी करत असे. परंतु अनेकवेळा त्यांना नशिबाने साथ दिली नाही, पण हे शेवटचे लॉटरीचे तिकीट आहे असा विचार करून  खरेदी केले आणि रविवारी श्रीराज कृष्णन यांना अचानक  कॉल आला की 7 मिलियन दिरहम (12 कोटी 71 लाख 70 हजार रुपये) जिंकले आहात. 
 
 
बराच वेळ त्यांना विश्वास बसत नव्हता... 
- श्रीराज कृष्णन म्हणाले की, सर्वप्रथम मला लॉटरी लागली आहे असा विश्वास बसत नव्हता.
- आबू-धाबीमध्ये बिग तिकीट ड्रॉ ने रविवारी लॉटरीची घोषणा केली. 
- श्रीराज कृष्णन कोप्परेमिब्ल यांना जवळपास 12.71 कोटी रुपयांची लॉटरी लागली. 
 
केरळचे आहेत श्रीराज कृष्णन...
- 33 वर्षाचे श्रीराज कृष्णन मुळचे केरळचे आहेत. मागील नऊ वर्षपासून आबूधाबी मध्ये एका शिपिंग कंपनीत नोकरी करतात. 
- श्रीराजला प्रत्येक महिन्याला भारतीय मुद्रेनुसार 6 दिरहम (1 लाख 9 हजार रुपये) मिळतात. 
- यापूर्वी त्यांनी लॉटरीचे अनेक तिकीट खरेदी केली, परंतु कधीच जिंकण्यात यशस्वी झाले  नाही.
- आबूधाबीच्या स्थानिक वृत्तपत्र खलीज टाइम्सशी बोलताना कृष्णन म्हणाले , एका दिवशी खूप विचार केला, की आता हे शेवटचे तिकीट आहे. असे त्यांनी सांगितले. 
- जेव्हा त्यांनी शेवटचे म्हणून तिकीट खरेदी केले तर हा नंबर 44698 लकी नंबर ठरला.  
- लॉटरी जिकल्यानंतर हे शहर सोडणार नाही असेही ते म्हणाले. श्रीराज हे जिंकलेल्या रुपयांचा उपयोग केरळमध्ये असलेल्या घराचे कर्ज मुक्त करणार असल्याचे सांगितले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, श्रीराज कृष्णन यांची  फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...