आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Woman Safe Rather Than Husband Home Delhi High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात विवाहित महिला सासरपेक्षा रस्त्यांवरच जास्त सुरक्षित, हायकोर्टाचे ताशेरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने २०११ मध्ये पत्नीचा खून करणा-या एका व्यक्तीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना, ‘भारतात विवाहित महिला सासरपेक्षा रस्त्यांवरच जास्त सुरक्षित आहेत,’ अशी कडक टिप्पणी केली.

न्यायमूर्ती प्रदीप नांद्राजोग आणि मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठाने सोमवारी आरोपी प्रदीप याची आव्हान याचिका खारिज केली. कनिष्ठ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. प्रदीपने या निकालाला आव्हान दिले होते. पत्नीची हत्या केल्यानंतर प्रदीप घटनास्थळावरून फरार झाला होता याचाच अर्थ तो दोषी आहे, असे खंडपीठाने सुनावले. भारतात खुनाच्या प्रत्येक दहाव्या प्रकरणात पतीच आरोपी असतो आणि पत्नी पीडिता ठरते. यावरून विवाहित महिला सासरी सुरक्षित नाहीत हेच सिद्ध होते,’ अशा कठोर शब्दांत खंडपीठाने आपले मत नोंदवले.