नवी दिल्ली - बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी म्हटले आहे, की भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष हिंदू विरोधी आणि मुस्लिम समर्थक आहेत. देशात सध्या प्रसिद्ध लेखकांनी पुरस्कार परत करण्याची मालिका सुरु आहे. त्यावर भाष्य करताना नसरीन यांनी हे वक्तव्य केले आहे. नुकतेच झालेले दादरी कांड, त्याआधी प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एम. कलबुर्गीं, महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरेंची हत्या याचा निषेध करत 30 हून अधिक लेखांनी साहित्य अकादमीसह शासनाचे इतर पुरस्कार परत केले आहेत. तस्लिमा म्हणाल्या, दादरी सारख्या घटनांनी आता दहशत वाटायला लागली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, भारतीय लेखकांनी पुरस्कार परत करुन सुरु केलेला विरोध योग्य असल्याचे त्या म्हणाल्या.
कोण आहे तस्लिमा नसरीन
तस्लिमा नसरीन प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची बांगलादेशातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कित्येक वर्षांपासून त्या भारताच्या आश्रयाला आहेत. सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये राहिल्या. आता त्यांचा मुक्काम दिल्लीत आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेल्या लेखकांची यादी