आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत घराला भीषण आग, 11 भारतीयांचा मृत्यू; सुषमा यांनी मदतीसाठी अधिकाऱ्यांना पाठवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नजरान शहरात घरात आग लागून 11 भारतीयांचा मृत्यू झाला. (सिम्बॉलिक फोटो) - Divya Marathi
नजरान शहरात घरात आग लागून 11 भारतीयांचा मृत्यू झाला. (सिम्बॉलिक फोटो)
दुबई/नवी दिल्ली - येथे नजरान शहरात एका घराला आग लागली, यात 11 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. 6 जण जखमीही झाले आहेत. सुषमा स्वराज यांनी ट्विट करून या घटनेबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आम्ही सातत्याने सौदी अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. सुषमा यांनी भारतीय स्टाफला त्वरित सौदीला रवाना होण्याचे निर्देशही दिले आहेत. त्या म्हणाल्या, आमचे अधिकारी नजरानचे गव्हर्नर प्रिन्स जलुवी बिन अब्देलाजीज यांच्या संपर्कात आहेत.

घराला एकही खिडकी नव्हती...
- रिपोर्ट्सनुसार, नजरान येथील ज्या घराला आग लागली त्याला एकही खिडकी नव्हती.
- सौदीच्या नागरी सुरक्षा विभागाने सांगितले की, हे सर्व कन्स्ट्रक्शन कंपनीत मजूर होते आणि फैसलिया डिस्ट्रिक्टच्या गोल्ड मार्केट एरियाजवळ राहत होते. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वातानुकूलित यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
 
यूपी, केरळ, बिहार आणि तामिळनाडूचे रहिवासी होते मृत
- या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व यूपी, बिहार, केरळ आणि तामिळनाडूचे रहिवासी होते. चार जण उत्तर प्रदेश, तीन जण केरळ, एक बिहार आणि एक तामिळनाडूचा होता. दोन जणांबाबत अजून माहिती मिळालेली नाही. या अपघातात आणखी 5 भारतीय भाजले आहेत.
- विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता गोपाल बागले म्हणाले, जेद्दाहमधील भारतीय कॉन्स्युलेट्सला मदत पोहोचवण्याचे सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...