आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांची विदेशात नोकरी करण्याची इच्छा झाली कमी; स्टार्टअपची स्थिती सुधारली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीयांची विदेशात नोकरी करण्याची रुची कमी झाल्यामुळे देशातील स्टार्टअपची स्थिती सुधारली आहे. जगभरात राजकीय अनिश्चितता असल्याने कुशल लोक देशातच राहून रोजगार मिळवण्याची किंवा नोकरी करण्याची शक्यता तपासून पाहत आहेत. रोजगाराबाबतची जागतिक साइट “इनडीड’ च्या एका सर्वेक्षणात हे तथ्य समोर आले आहे.  
 
या सर्वेक्षणातील आकडेवारी मंगळवारी जारी करण्यात आली असून त्यानुसार गेल्या वर्षी अमेरिकेमध्ये नोकरीचा शोध घेणाऱ्यांची संख्या ३८ टक्क्यांनी घटली आहे. इंग्लंडमध्ये नोकरी शोधणाऱ्यांच्या संख्येत ४२ टक्क्यांची घट झाली आहे. ब्रेक्झिटचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीयांच्या विदेशात नोकरी शोधण्याच्या इच्छेवर परिणाम झाला असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.  

आखाती देशांमध्येदेखील नोकरीचा शोध घेणाऱ्या भारतीयांच्या संख्येत घसरण दिसून येत आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये नोकरी शोधणाऱ्यांची संख्या २१ टक्के कमी झाली आहे. तर, दुसरीकडे जर्मनी आणि आयर्लंडसारख्या देशात नोकरी शोधणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली आहे. या कालावधीत जर्मनीमध्ये नोकरी शोधणाऱ्यांची संख्या १० टक्क्यांनी वाढली आहे. आयर्लंडमध्ये या संख्येत २० टक्क्यांची वाढ झाली आहे.  भारतीयांमध्ये नोकरी करण्याच्या दृष्टीने अजूनही अमेरिका टॉपवर आहे. ४९ टक्के भारतीयांनी अमेरिकेत नोकरी शोधणार असल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...