आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India\'s 10 Teachers Who Became Successful Politicians

डॉ. योगेंद्र यादव यांची \'आप\'शी वाढती जवळीक केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला खूपते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि नवे-नवे राजकारी डॉ. योगेंद्र यादव विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) सदस्य आहेत. त्यांचे सदस्यत्व वादाच्या भोव-यात अडकले आहे. डॉ. यादव सध्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या (आप) प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. आपशी वाढत असलेल्या त्यांच्या जवळीकीमुळे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवले असून युजीसीचे सदस्यत्व रद्द का करण्यात येऊ नये याची विचारणा केली आहे. मंत्रालयाने सात दिवसांच्या आत त्यांना याबद्दलचे स्पष्टीकरण मागितले होते, त्याची मुदत 11 सप्टेंबर रोजी संपली आहे. डॉ. यादव यांनी त्यांचे उत्तर मंत्रालयाला पाठवले आहे.

भारतातील विविध विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालय यांच्याशी संबंधीत अनेक व्यक्ती या राजकारणात सक्रिय सहभागी आहेत. ही काही नवी घटना नाही. शिक्षक हे लाभाचे पद नसल्याने, ते निवडणूकीलाही उभे राहू शकतात. अनेक राजकारणी हे पूर्वी शिक्षक असल्याचे शेकडो दाखले देशाच्या राजकारणात पाहायला मिळतात.