आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादसह ३८ रेल्वेस्थानकांचा हाेणार पुनर्विकास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - औरंगाबाद,जालना, परभणी, नांदेड, लातूरसह राज्यातील ३८ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. देशातील ४०७ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी खुल्या निविदा मागवण्यात येणार आहेत. यात ए-१ आणि श्रेणीच्या स्थानकांची निवड करण्यात आली आहे.
मेट्रो, प्रमुख शहरे धर्मिक स्थळांचा यात समावेश आहे. राज्यातील इतर स्थानकांत अकोला, बडनेरा, भुसावळ, चाळीसगाव, जळगाव, मनमाड, मिरज, नाशिक रोड, पनवेल, साईनगर, शेगाव, अहमदनगर, दौंड, कोल्हापूर, कोपरगाव, लोणावळा, बल्लारशा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, सीएसटी, एलटीटी, पुणे, नागपूर, कल्याण, दादर, ठाणे, सोलापूर, वांद्रे टर्मिनलचा समावेश आहे.