आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना स्मार्टफोन, ना व्हॉट्सअॅप; 90's मध्ये अशी होती लेस्बियनची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात समलैंगिक संबंध हे आजच नव्याने समाजात पाहायला मिळायला लागले असे नाही. अनेक दशकांपासून समाजामध्ये असे संबंध पाहायला मिळतात. मात्र 90 च्या दशकता जेव्हा गुगल, स्मार्टफोन नव्हते, व्हॉट्सअॅपसारखे क्षणात संपर्क साधू शकेल असे कोणतेही माध्यम नव्हते. त्याकाळात दोन मुलींमध्ये प्रेम फुलेले असेल तेव्हा काय झाले असेल ? हिच कथा यू-ट्यूबवर द अदर लव्ह स्टोरी या वेब सीरिजच्या माध्यमातून सांगितली जात आहे. ही भारतातील पहिली लेस्बियन वेब सीरिज आहे.
12 एपिसोडची वेब सीरिज, पहिला एपिसोड रिलीज
- वेब सीरिजचा पहिला भाग ऑनलाइन रिलीज झाला आहे. त्याचे नाव 'द मीटींग' होते. 10 मिनीटांच्या या ऐपिसोडला आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांनी पाहिेले आहे.
मैत्रिणीची लव्हस्टोरी पाहून सुचली आयडिया
- ही वेब सीरिज रुपा रावने तयार केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार भारतात असा विषय पडद्यावर आणणे सोप काम नाही. त्यामुळेच ही सीरिज तयार करणाऱ्यांनी यू-ट्यूबचा आधार घेतला आहे.
- रुपा एका आयटी कंपनीत काम करत होती, तेव्हापासून तिच्या डोक्यात हा विषय घोळत होता. ती सांगते, 'तिच्या एका जवळच्या मैत्रिणीची एका मुलीसोबत 14 वर्षांपासून रिलेशनशिप होती.'
- त्यांच्या संबंधावरुनच मला आयडिया आली की या विषयावर एक फिल्म तयार होऊ शकते. मी वाट पाहात होते, यावर कोणी फिल्म तयार करते का. पण कोणीही हा विषय हाताळत नाही हे दिसल्यानंतर मी स्वतः हे काम हातात घेतले.
- वास्तविक यासाठी माझ्याकडे लिमिटेड बजेट होते. त्यात फिचर फिल्म तयार होणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही वेब सीरिज तयार करण्याचा निर्णय घेतला.
- यंगस्टर्सपर्यंत पोहोचण्याचे यापेक्षा प्रभावी माध्यम आम्हाला दुसरे कोणतेही वाटले नाही.
प्रोड्यूसर्सने दिला नकार, क्राऊड फंडिगमधून उभारला पैसा
- रुपा सांगते, या फिल्मसाठी एकही इन्व्हेस्टर तयार होत नव्हता. हा विषयच त्यांच्यासाठी अस्पृष्य होता. फिल्मची आयडिया घेऊन 8 प्रोड्यूसरकडे गेली होती. मात्र सर्वांनी नकार दिला.
- बहुतेकांचे तर हेच म्हणणे होते की ही वेब सीरिज लवकरच बॅन होईल. काहींनी विचारले की यात किती सेक्स सीन आहेत.
- अशा अनेक संकटातून गेल्यानंतर रुपाने क्राऊड फंडिगमधून पैसे उभारण्याचा पर्याय निवाडला. त्यासाठी ऑनलाइन कँपेनही केले होते.
- रुपा म्हणाली, या सगळ्या परिस्थितीतही काही लोकांचा चांगला सपोर्ट मिळाला. एवढेच नाही वेब सीरिजसाठी निर्माताही मिळाला.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून समजून घ्या...
> रुपाला कशी सुचली स्टोरी
> किती अवघड होता वेब सीरिज यू-ट्यूबपर्यंत येण्याचा प्रवास
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...