आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे पुढचे पाऊल, चंद्रावर मानव मोहीम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चांद्रयानानंतर भारताने आता चंद्रावर मनुष्य उतरवण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. देशाच्या पहिल्या मानव मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि संरक्षण मंत्रालयात करार करण्यात आला आहे. नील आर्मस्ट्राँग यांनी 1969 मध्ये चंद्रावर पहिले पाऊल टाकल्याच्या सुमारे 50 वर्षांनंतर भारताची मोहीम सुरू होत आहे.
यासाठी भारताचे हवाई दल सामग्री व उपकरणांची जुळवाजुळव करणार आहे. सशस्त्र दल आरोग्य सेवा संचालनालयाचे (डीजीएमएस) एअर मार्शल डी.पी. जोशी यांनी सांगितले की, चंद्रावर पाठवण्यासाठी व्यक्तीची निवड आम्हीच करणार आहोत. तो एखादा फायटर पायलटही असू शकतो. प्राथमिक संशोधनासाठी 10 कोटी रुपयांचे बजेट ठरवण्यात आले आहे.