आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही विमान वाहतूक क्षेत्रात भारताची ओळख ‘व्हाइसरॉय टेरिटरी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताला ७० वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले खरे, पण विमान वाहतुकीच्या क्षेत्रात देशाची ओळख आजही “व्हाइसरॉय टेरिटरी’ अशीच आहे. याचे कारण म्हणजे भारतीय विमानांना दिला जाणारा नोंदणी क्रमांक. विमानांची ओळख निश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेने (आयसीएओ) सर्व देशांना एक विशिष्ट कोड दिला आहे. भारताला इंग्रजांच्या काळात मिळालेला व्हाइसरॉय टेरिटरी “व्हीटी’ हा कोड आजपर्यंत कायम आहे. ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील देशांना त्यावेळी “व्हीए’ ते “व्हीझेड’पर्यंत कोड दिले गेल होते. एअर इंडियाच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी हा कोड बदलण्यासाठी नागरी उड्डायण मंत्रालयाकडे दाद मागितली आहे. 


नागरी उड्डयन मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाले तरीही भारतात आजही ‘व्हाइसरॉय टेरिटरी’ कायम आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन परिषदेनुसार सर्व देशांना वर्णानुक्रमाने कोड निवडण्याचा अधिकार आहे. यामुळे विमानांची राष्ट्रीयता ओळखली जाते. इंग्रजांच्या काळात भारताला ‘व्हीटीए’ कोड दिला गेला. १९२८ मध्ये यात बदल करून ‘व्हीटी’ असे करण्यात आले. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण विमानांची ओळख आजही व्हाइसरॉय टेरिटरी अशीच आहे. हा विषय हाती घेऊन कोड बदलावा, अशी मागणी करण्यात आली. मागील वर्षी भाजपचे खासदार तरुण विजय यांनी राज्यसभेत हा मुद्दा मांडला होता. 


पाकिस्तानने त्यांचा कोड बदलला

स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानच्या विमानांसाठी “व्हीटी’ कोडचा वापर केला जाता होता. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांपर्यंत ही स्थिती कायम होती. परंतु नंतर यात “एपी’ असा बदल करण्यात आला. हाँगकाँगने १९४७ मध्ये त्यांच्या विमानाचे कोड बीआर-एच बदलून बी-एच केले होते. 

 

भारताने दिलेले तिन्ही पर्याय नाकारले
वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, २००४ मध्ये भारताने तीन पर्याय दिले होते. यात आयएन म्हणजेच इंडिया, बीएच भारत आणि एचआय हिंदुस्तान यांचा समावेश होता. परंतु चीनकडे ‘बी’ सिरीज असल्याने भारताला ‘बीएच’ आणि इटलीकडे ‘आय’ सिरीज असल्याने ‘आयएन’ कोड मिळाला नाही.  ‘एचआय’ हे कोड डोमिनिकन रिपब्लिककडे आहे. आयसीएओने ‘एक्स’ आणि ‘व्ही’ चा पर्याय दिला होता. पण उपयोग झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...