आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या कुटुंबाने भूषविली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांपासून केंद्रीय संरक्षण मंत्र्यांपर्यंतची पदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात राज्यघटनेने लोकशाही स्थापन झाली, मात्र स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतरही सत्ता काही कुटुंबांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. सोमवारी संसदेत भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला. गोरखपूरमधून निवडूण आलेले योगी आदित्यनाथ म्हणाले, मुलायमसिंह यादव स्वतः समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचे दोन भाऊ पक्षाचे महासचिव आणि मुलगा प्रदेशाध्यक्ष आहे. हा समाजवाद आहे की परिवारवाद ? योगी आदित्यनाथ यांच्या या प्रश्नाने राजकीय घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. कारण, सध्या घराणेशाही केंद्रीय राजकारणापासून राज्या-राज्यांमध्येही पसरलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्षात घराणेशाही दिसते. एकही पक्ष त्याला अपवाद राहिलेला दिसत नाही.

देशातील सर्वात मोठा पक्ष समजल्या जाणा-या काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाहीची पाळेमुळे आता खोलवर रुजली आहेत. कॅडरबेस पक्ष ज्यांना म्हटले जाते त्या कम्यूनिस्ट आणि भारतीय जनता पक्षामध्येही घराणेशाही उघड उघड दिसत नसली तरी दक्षिण भारत, महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही आणि परिवारवादच महत्त्वाचा मानला जात आहे.

घराणेशाही लोकशाहीसाठी घातक समजली जाते. मात्र, स्वातंत्र्यापासून ज्या पक्षाने या देशावर राज्य केले त्यांनी निर्माण केलेली घराणेशाही आता इतरही पक्षांमध्ये पसरत गेली आहे. समाजवादी म्हणवून घेणा-या पक्षांमध्येही याचे आता संक्रमण झाले आहे. उत्तर भारतातील लालू प्रसाद असो किंवा मुलायमसिंह नाहीतर रामविलास पासवान या सर्वांच्या वंशजांना राजकारणाचा मोह टाळता आलेला नाही. महाराष्ट्रातही घराणेशाहीची परंपरा आता दिग्गजांपासून छोट्या शहरातील आणि खेड्यापाड्यांच्या नेत्यांपर्यंत जावून पोहोचली आहे.

देशाच्या सत्तेची चावी ज्या राज्यात आहे, त्या उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षात घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे.


पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, मुलायमसिंहांच्या कुटुंबातील कोण कोण लोकसभेत आणि उत्तरप्रेदश विधानसभेत आणि इतर सत्ताधारी पदांवर आहे...