आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India's Mars Mission Returns Its Image Of The Red Planet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्लॅकआऊटमधून बाहेर आलेल्या मंगळयानाने पाठवले छायाचित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताची सर्वांत महत्त्वाकांक्षी आणि कमी खर्चात यशस्वी झालेली मोहीम म्हणून ओळख असलेल्या मोहिमेतील मंगळयानाने या लाल ग्रहाच्या पृष्ठभागाचे आणखी एक छायाचित्र पाठवले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) हे छायाचित्र बुधवारी जाहीर केले. भारतीय मंगळयानावर असलेल्या मार्स कलर कॅमेऱ्याने हे छायाचित्र गेल्या २४ ऑगस्ट रोजी ४२८२ मीटर उंचीवरून घेतलेले आहे. २२२ मीटर रिझोल्युशनच्या या छायाचित्रात मंगळाच्या पृष्ठभागावरील पठार तसेच काही खड्डेही दिसत आहेत.
सुमारे १५ दिवस मंगळयानाने कोणतीही माहिती किंवा छायाचित्र इस्रोकडे पाठवले नव्हते. पंधरा दिवसांच्या खंडानंतर हे यान पुन्हा कार्यरत झाले आहे. यापूर्वी १४ जुलै रोजी एक छायाचित्र या यानाने पाठवले. ते पहिले छायाचित्र होते.
भारताचा मंगळ मोहिमेतील हा पहिला उपग्रह ८ ते २२ जून या काळात ब्लॅकआऊट टप्प्यात होता. या काळात त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटलेलाच होता. मंगळ आणि पृथ्वीच्या मध्ये सूर्य आल्याने ही स्थिती निर्माण झाली होती.
पुन्हा सुरळीत कार्य
ब्लॅकआऊटमधून बाहेर आल्यानंतर मंगळयानाने पुन्हा आपले कार्य सुरळीत सुरू केले आहे. या माध्यमातून शास्त्रज्ञ विविध आकडेवारी एकत्रित करत आहेत. मुळात ही मोहीत सहा महिन्यांसाठीच होती. मात्र, यानात आणखी बरेच इंधन शिल्लक असल्याने त्याची सेवा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.