आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's Oldest Watch Making Company HMT To Shut Down

एचएमटी घड्याळांची टिकटिक थांबणार; कंपनी बंद करण्याचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ औरंगाबाद- एकेकाळी सर्वांची आवड असलेल्या एचएमटीचे घड्याळ आता मिळणार नाही. सरकारने हे घड्याळ बनवणाऱ्या कंपन्या एचएमटी वॉचेस आणि एचएमटी चिनार वॉचेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच समूहाची आणखी एक कंपनी एचएमटी बेअरिंग्जदेखील बंद होणार आहे. या तीनही कंपन्या अनेक दिवसांपासून तोट्यात आहेत. या कंपन्यांना पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा िनर्णय झाला. या निर्णयामुळे सुमारे एक हजार कामगार बेरोजगार होणार आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी चांगले व्हीआरएस पॅकेज देण्यात येत असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. २००७ मध्ये असलेल्या पगाराच्या आधारावर या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याची घोषणा सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. कंपनी बंद करणे आणि व्हीआरएसचे पैसे देण्यासाठी मंत्रीमंडळाने ४२७ कोटी ४८ लाख रुपयांना मंजूरी दिली आहे. तसेच कंपनीची चल-अचल मालमत्ता सरकरी धोरणाप्रमाणे िवक्री होणार आहे.
अवजड उद्योग विभागाअंतर्गत उत्पादन, कंसल्टेंस आणि कॉन्ट्रॅक्टिंग करण्यात आलेले ३१ केंद्रीय उपक्रम आहेत. यातील १२ नफ्यात तर उर्वरीत १९ उद्योग तोट्यात सुरु आहे. सप्टेंबर २०१४ मध्येच सरकारने एचएमटीला बंद करण्याचा िनर्णय घेतला होता. तसेच तंुगभद्रा स्टील आणि हिंदुस्तान केबल्स या कंपन्या बंद करण्यास मंत्रीमंडळाने या पूर्वीच तत्वत: मंजूरी दिली आहे.

औरंगाबादेतील कंपनी बंद होणार नाही : गिते
एचएमटीच्या औरंगाबादेतील कंपनीत दूध डेअरीसाठीचे युनिट इतर मशीन टूल्स बनतात. येथे सध्या ८० कर्मचारी आहेत. केंद्राची आर्थिक मदत घेता कर्मचाऱ्यांनी कंपनी नफ्यात आणली. त्यामुळेच ही कंपनी बंद हाेणार नाही. कंपनीत दुग्धव्यवसाय पूरक उपकरणांच्या निर्मितीबाबत बाेलणी सुरू आहे.
-अनंत गिते, अवजड उद्योगमंत्री