आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेमदेव देववर्मनची निवृत्ती जाहीर, वयाच्या ३१ वर्षी टेनिसला अलविदा; वर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नव्या २०१७ वर्षाला नवीन काहीतरी सुरुवात म्हणत भारताच्या युवा खेळाडू साेमदेव देववर्मनने अांतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीची घाेषणा टि्वटरवरून केली. त्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय जाहीर करून चाहत्यांना माेठा धक्का दिला. भारताचा नंबर वन टेनिसस्टार म्हणून त्याने अल्पवधीत अाेळख निर्माण केली हाेती. मात्र, दुखापतीमुळे ताे सातत्याने अपयशी ठरला. 
  
भारताचा ३१ वर्षीय टेनिसस्टार साेमदेव हा मागील २०१२ पासून खांद्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्रस्त अाहे. मात्र, त्याने यावर मात करत अनेक माेठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, त्याला समाधानकारक असे यश संपादन करता अाले नाही.  त्याने २०१० मधील एशियन गेम्समध्ये एकेरी अाणि दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली हाेती. २०१० राष्ट्रकुल स्पर्धेतही ताे चॅम्पियन ठरला. याच उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला २०११ मध्ये अर्जुुन पुरस्काराने गाैरवण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...