आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या Railway Station च्या आर्किटेक्चरमुळे यांना मिळाली जगभरात ओळख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाची पहिली रेल्वे 162 वर्षांपूर्वी मुंबई बोरी बंदर ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 ला चालवण्यात आली होती. 1850 च्या दशकात मुंबईच्या रेल्वे रेळांवर ट्रायलपासून ते आतापर्यंत भारतीय रेल्वेमध्ये अनेक बदल झाले आहेत. याचे परिणाम आज भारताचे रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतील रेल्वेच्या इतिहासात भारतीय रेल्वे स्थानकांमध्येही अनेक बदल झाले आहेत. आज रेल्वे बजेटच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला भारतातील अप्रतिम स्थापत्य वास्तूशास्त्राचे प्रतिक असलेल्या तसेच आधुनिकतेच्या दृष्टीने काही सर्वोत्कृष्ट रेल्वेस्थानकांबद्दल माहिती देत आहो.

- छत्रपति शिवाजी टर्मिनस (मुंबई)
मुंबईचे पहिले रेल्वे स्थानक बोरी बंदरला नवीन रूप देण्याची सुरूवात 1878 मध्ये सुर झाली. या कामाला 10 वर्ष लागले आणि 1887 ला हे पूर्णपणे तयार झाले. सुरूवातीला या स्थानकाचे नाव ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरीया यांच्यानावर व्हिक्टोरीया टर्मिनस असे ठेवण्यात आले होते. मात्र नंतर याचे नाव बदलून छत्रपति शिवाजी टर्मिनस (सीएसटी) करण्यात आले. ही बिल्डिंग व्हिक्टोरियन-इटली आर्किटेक्चटरसाठी जगभरात ओळखली जाते. यामध्ये भारतीय शैलीची स्पष्टपणे छाप दिसून येते. युनेस्कोने या इमारतीला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा भारतातील इतर काही अप्रतिम रेल्वे स्थानक