आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indifference In Congress Over The Election Policy

पक्षांतर्गत निवडणुकीच्या मुद्द्यांवर काँग्रेसमध्ये वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पक्षांतर्गत निवडणुकांच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करण्याच्या राहुल गांधी यांच्या पायलट प्रोजेक्टमुळे काँग्रेस नेत्यांत मतभेद निर्माण झाले आहेत. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि महिला व बालविकास मंत्री कृष्णा तीरथ यांच्या जागेवर अंतर्गत निवडणुकांच्या माध्यमातून उमेदवार निवडण्याच्या मुद्द्यावर काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे, तर महासचिव अजय माकन आणि गुरुदास कामत यांची लोकसभा जागेचा पायलट प्रोजेक्टमध्ये समावेश करण्याची विनंती राहुल गांधींना करण्यात आली आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघाचा समावेश राहुल गांधी यांच्या पायलट प्रोजेक्टमध्ये करण्याची विनंती केली होती, अशी विनंती आपण केली होती असे मकान यांनी म्हटले आहे.
सिब्बल यांचा नकार
पायलट प्रोजेक्टमधील माझ्या जागेबाबत मला आधीही विचारणा करण्यात आली नव्हती आणि आताही त्यासंबंधीच्या विरोधाबाबत मला काहीच माहीत नसल्याचे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे. महिला आणि बालविकास मंत्री कृष्णा तीरथ यांनी सांगितले की, चांदणी चौक आणि उत्तर पश्चिम दिल्लीची माझी सीट या पायलट प्रोजेक्टमधून वगळण्यात आल्याचे मला फोनवर सांगण्यात आले. या ठिकाणी आता नवीन उमेदवार निवडणूक लढेल.