आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट ब्लास्टमुळे प्रवाशांना विमानापर्यंत नेणाऱ्या इंडिगो बसची काच फुटली, पाच जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानाच्या इंजिनाच्या आवाजामुळे इंडिगो बसची समोरची काच फुटली. यात 5 प्रवासी जखमी झाले. (फाइल) - Divya Marathi
विमानाच्या इंजिनाच्या आवाजामुळे इंडिगो बसची समोरची काच फुटली. यात 5 प्रवासी जखमी झाले. (फाइल)
नवी दिल्ली - फ्लाइटपर्यंत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो कोच (बस)ची काचेची विंडो एका विमानाच्या जेट ब्लास्टमुळे (इंजिनाच्या आवाजामुळे) फुटली. या घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर विमानतळाच्या क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले. डीजीसीए घटनेची चौकशी करत आहे. 
 
असे आहे प्रकरण
- वृत्तसंस्थेनुसार, शनिवारी पहाटे 4.50 वाजता इंडिगो एअरलाइन्सचा एक कोच प्रवाशांना फ्लाइट नंबर 6E-191मध्ये नेण्यासाठी तयारीत होता. 
- यादरम्यान पार्किंगजवळ स्पाइसजेटची फ्लाइट नंबर SG-253 तेथे लँड होत होती. विमानाच्या जेट ब्लास्ट (इंजिनाचा आवाज) मुळे इंडिगो कोचच्या समोरच्या विंडोची काच फुटली. यामुळे आत बसलेले 5 प्रवासीही जखमी झाले.
- जखमींना त्वरित विमानतळाच्या क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. इंडिगोच्या ज्या फ्लाइटमध्ये या प्रवाशांना नेण्यात येत होते ती दिल्लीहून मुंबईला जाणार होती.
 
डीजीसीएने काय म्हटले?
- डीजीसीएने घटनेची कबुली देत पूर्ण चौकशी केली जाईल असे म्हटले आहे.
- स्पाइसजेटने म्हटले की, त्यांचे विमान त्याच्या ठरलेल्या  जागी पार्क होण्यासाठी जात होते. या घटनेबद्दल आताच काही म्हणणे खूप घाईचे ठरेल, असेही स्पाइसजेटने म्हटले आहे. एखादी बाहेरची वस्तू, जेस्ट ब्लास्ट किंवा बसच्या मूव्हमेंट रुल फॉलो न केल्याने अशी घटना होऊ शकते. 
बातम्या आणखी आहेत...