आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IndiGo Flight From Mumbai To Delhi Catches Fire, Several Passengers Injured

लॅंडिंग करताना इंडिगो विमानाला लागली आग, प्रवासी सुरक्षित पण काहींना दुखापती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- आग लागल्यानंतर विमानाला असे थांबविण्यात आले. @shukla_tarun यांनी काढलेले छायाचित्र.)
नवी दिल्ली- मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाला आज इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागली. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानाबाहेर काढण्यात आले. यादरम्यान काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, किती प्रवाशांना दुखापती झाल्या याची माहिती मिळालेली नाही.
दुखापती झालेल्या प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानतळावरील टर्मिनल 1 डी येथे ही घटना घडली. विमानात आग लागल्याची माहिती सर्वांत प्रथम एयर ट्राफिक कंट्रोलला समजली. प्रवाशांना इमरजर्न्सी गेटमधून बाहेर काढण्यात आले. इंडिगोच्या प्रशासनाने आग लागल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. परंतु, विमानातून आग निघत असल्याचे दिसून येत होते.