आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी गुजरातची सून असे सांगायच्या इंदिरा गांधी, अशी होती त्यांची Love story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फिरोज गांधी यांच्यासोबत प्रेमविवाह होता. - Divya Marathi
देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फिरोज गांधी यांच्यासोबत प्रेमविवाह होता.
नवी दिल्ली- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जेव्हा कधी गुजरातमध्ये प्रचारासाठी जात तेव्हा त्या डोक्यावरून साडीचा पदर खाली पडू द्यायच्या नाहीत. त्या नेहमीच आपण गुजरातची सून असल्याचे अभिमानाने सांगायच्या. इंदिरा नेहरूपासून गांधी तेव्हा बनल्या जेव्हा त्यांनी गुजरातच्या पारशी तरूण फिरोजसोबत लग्न केले. त्याकाळी हिंदू आणि पारशी हे वेगवेगळ्या धर्मातील लग्नाने भारतीय राजकारणात वादळ येऊ नये म्हणून महात्मा गांधी यांनी फिरोज खान दारूवाला यांना गांधी हे आडनाव उपाधी म्हणून दिले. नंतर हे घराणे राजकारणात गांधी घराणेच म्हणून प्रसिद्ध झाले. मरीन इंजिनियर होते फिरोजचे वडिल...
- देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधीचे नाव लहानपणी इंदिरा प्रियदर्शनी होते.
- 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरी इंदिरांना इंदू याच टोपणनावाने सर्व आवाज देत असे. नेहरूंची ती एकुलती एक मुलगी होती.
- इंदिरांचे नाव त्यांचे आजोबा पंडित मोतीलाल नेहरू यांनी ठेवले होते. इंदिरा नावाचा अप्थ होतो, नितळ कांती, लक्ष्मी आणि शोभा.
- तर 12 सप्टेंबर 1912 रोजी मुंबईतील फोर्ट तेलुमजी नरिमन हॉस्पिटलमध्ये जन्मलेले फिरोज मूळ गुजराती होते.
- फिरोज यांचे वडिलांचे नाव जहांगीर होते तर आईचे नाव रतिबाई होते.
- फिरोजचे वडिल जहांगीर मरीन इंजिनियर झाल्यानंतर मुंबईत शिफ्ट झाले. त्याचदरम्यान फिरोज यांचा मुंबईत जन्म झाला.
- जहांगीर यांना पाच मुलं होती त्यात फिरोज सर्वात लहान होते. वडिलांच्या मृत्यूनंतर फिरोज आपली आई व भावंडासमवेत आईच्या घरी अलाहाबादला शिफ्ट झाले.
- फिरोजने कॉलेजचे शिक्षण अलाहाबादमध्ये घेतले आणि पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. मात्र काही दिवसातच ते परत भारतात आले.
(चर्चेत का- 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची 100 वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने आम्ही त्यांच्या आयुष्याबाबत माहिती देत आहोत.)
नेहरूच्या घरी येणे- जाणे होते फिरोज-
- वर्ष 1930 मध्ये फिरोजने काँग्रेसचा नेता म्हणून युवकांचे नेतृत्व केले. याच दरम्यान त्यांची भेट नेहरू व कमला नेहरू यांच्याशी झाली.
- स्वतंत्र लढ्याच्या एका आंदोलनादरम्यान इंदिराची आई कमला नेहरू एका कॉलेजमध्ये आंदोलन करत असताना बेशुद्ध पडल्या. त्यावेळी त्यांची देखभाल फिरोज गांधी यांनी केली.
- कमला नेहरू त्या दरम्यान सारख्या आजारी असत. त्यांची विचारपूस करण्यासाठी फिरोज नेहमी ये-जा करायचे. त्यामुळे ते नेहरू कुटुंबियांच्या जवळ गेले.
- याच काळात इंदिरा आणि फिरोज यांच्यात जवळीक निर्माण झाली. फिरोज जेव्हा अलाहाबादमध्ये असत तेव्हा ते जरूर आनंद भवनात जात असत.
महात्मा गांधींनी दिले आडनाव-
- काही काळानंतर फिरोज आणि इंदिरा यांच्यातील प्रेमसंबंधांची माहिती कमला नेहरूंना समजली व त्यांना राग आला.
- दोघांचे वेगवेगळे धर्म असल्याने त्यांच्या लग्नाने भारतीय राजकारणात वादळ येऊ नये म्हणून नेहरूंनी महात्मा गांधींकडे सल्ला मागितला.
- यानंतर महात्मा गांधी यांनी फिरोज खान दारूवाला यांना गांधी हे आडनाव उपाधी म्हणून दिले.
- तेव्हा फिरोज खान, फिरोज गांधी बनले आणि इंदिरा नेहरू नंतर ‘इंदिरा गांधी’ बनल्या.
- फिरोज आणि इंदिरा यांचे लग्न 12 मार्च 1942 रोजी हिंदू रिती-रिवाजांनुसार झाले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इंदिरा गांधींशी संबंधित निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...