नवी दिल्ली - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर पाळत ठेवली जात असल्याचा खुलासा झाल्यानंतर आता नेहरुंची कन्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने नेताजींचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते. इंदिरा गांधी पतंप्रधान असताना त्यांच्या कार्यालयातून राष्ट्रीय अभिलेखागार कार्यालयाला पत्र पाठवण्यात आले होते. त्यात नेताजींच्या अस्थी जपानहून भारतात आणण्याचा उल्लेख होता. मात्र, नेताजींचा मृत्यू कसा आणि केव्हा झाला हे आजपर्यंत कोडेच राहिले आहे.
एवढेच नाही, तर इंदिरा गांधी पंतप्रधान असतानी नेताजी बोसांच्या संबंधीत दोन फाइल गायब झाल्या होत्या आणि दोन नष्ट करण्यात आल्या होत्या. 1969 आणि 1972 मध्ये पंतप्रधान कार्यालयाने राष्ट्रीय अभिलेखागार कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून या दोन फाईल नष्ट करण्यात आल्या आहेत, त्यांची फोटो कॉपी देखील सुरक्षीत ठेवण्यात आलेली नाही. या फाइलचा क्रमांक 23(156)/(52) होता. तर, इतर दोन फाइल 'मिसिंग' असल्याचे ठरविण्यात आले होते. दरम्यान, नेताजींच्या कुटुंबातील सदस्य जर्मनीमध्ये पंतप्रधान
नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. मोदी सध्या युरोप आणि कॅनडाच्या दौर्यावर आहेत.
सर्व फाइल इंदिरा गांधीच्या कार्यालयात होत्या
राष्ट्रीय अभिलेखागारला पत्र पाठवण्याच्या आधी नेताजींच्या संबंधीत सर्व फाइल तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयात (पीएमओ) होत्या. तिथून त्या अभिलेखागार येथे पाठवल्या जाणार होत्या. मात्र सर्व फाईल तिथपर्यंत पोहोचल्या नाही.
हरवलेल्या फाइलमध्ये काय होते?
इंदिरा गांधींच्या कार्यालयातून गायब झालेल्या फाइलमध्ये नेमके काय होते, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. या फाइल नेताजींच्या संबंधीत होत्या एवढे नक्की. त्यामध्ये नेताजींच्या अस्थी जपानहून भारतात आणण्याचे उल्लेख होता. दिल्लीतील लाल किल्ल्यात एक संग्रहालय तयार करुन तिथे या अस्थी ठेवण्याच्या मागणीचे दस्तऐवज त्या फाइल मध्ये होते. तर, फाइल क्रमांक -2(64) 66-70 मध्ये नेताजींच्या अस्थींच्या तपासा संदर्भात नेमलेल्या संमितीची माहिती होती.
पाच फाइलींचे नाव आणि क्रमांक देखील उघड नाही झाले
माहिती अधिकारांतर्गत नुकताच खुलासा झाला आहे, की नेताजींशी संबंधीत पाच अशा फाइल्स आहेत ज्यांचे नाव आणि क्रमांक गोपनियतेच्या कारणामुळे उघड होऊ शकलेले नाही.
नेताजींच्या प्रत्येक पत्राची आयबीकडून होत होती तपासणी
गोपनीयदस्तऐवजांनुसार, आयबीने कोलकात्यातील नेताजींच्या 1-वूडबर्न पार्क आणि 38 /2-एल्गिन रोड या वडिलोपार्जित घरांवर पाळत ठेवली होती. अगदी ब्रिटिश सरकारसारखीच. नेताजींचे भाऊ शरतचंद्र यांची मुले शिशिरकुमार बोस आणि अमियनाथ बोस यांच्यावरही आयबीची पाळत होती. ऑस्ट्रियात राहणाऱ्या नेताजींच्या पत्नी एमिली शेंकल यांना या दोघांनी अनेक पत्रे लिहिली होती. आयबीचे अधिकारी नेताजींच्या प्रत्येक नातेवाइकाच्या पत्राची तपासणी करत होते. नेताजींचे कुटुंबीय कोणाला भेटत होते आणि काय चर्चा करत होते हेही पाहिले जात होते.
फोटो - 'पीएमओ'ची नोट, ज्यात फाइल गायब झाल्याचे मान्य करण्यात आले होते.