आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधींना लावायचा होता कृषी उत्पन्नावर कर; विकिलीक्सचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 'विकीलीक्स'च्या एका मागून एक खुलाशामुळे कॉंग्रेससह गांधी परिवाराची डोकेदुखी वाढली आहे. भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1975मध्ये कृषी उत्पन्नावर कर (टॅक्स) लावायचा होता, असा खुलासा 'विकीलीक्‍स'ने करून खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वी राजीव गांधी हे स्वीडिश कंपनीचे एजेंट होते तसेच आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या घरी अमेरिकन गुप्तहेर राहत असल्याचा खुलासा विकिलीक्सने केला होता.

विकिलीक्‍सच्या माहितीनुसार, इंदिरा गांधी एकदा बंगळूरमधील इंस्टिट्यूट फॉर अ‍ॅण्ड इकॉनॉमिक चेंजच्या एका कार्यक्रमात उपस्थित होत्या. आपल्या भाषणात इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, कृषी क्षेत्रामधून मिळणार्‍या उत्पन्नावर कर माफी देणार्‍या योजना बंद केल्या पाहिजेत. तसेच ग्रामीण भागातील श्रीमंत नागरिकांकडूनही कर आकारला पाहिजे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांना पाणी व विजेत देण्यात येणार्‍या सवलतीबाबतही इंदिरा गांधींनी नाराजी व्यक्त केली होती.