आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत - चीन यांची प्रतिनिधी स्तरावरील बैठक २० एप्रिलला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठक २० एप्रिल रोजी होणार आहे. यामध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जैश-ए-मोहंमदचा म्हाेरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याच्या प्रस्तावास चीनकडून होत असलेल्या विरोधाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. बीजिंगमध्ये दोन दिवसांच्या या बैठकीत सीमाक्षेत्र आणि व्यूहात्मक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

भारत-चीन सीमाक्षेत्राच्या चर्चेसाठी डोवाल भारताचे विशेष प्रतिनिधी आहेत. त्यांचे चीनमधील समपदस्थ यांग जेची यांच्याशी ते चर्चा करतील. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. चर्चेच्या या १९ व्या फेरीत दोन्ही बाजू सीमाक्षेत्र आणि तेथे शांतता कायम ठेवण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. आमची या दिशेने पुढे जाण्याची इच्छा आहे,असे सूत्रांनी सांगितले.

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या संयुक्त राष्ट्रातील प्रस्तावास चीनने विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. डोवाल हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात चीनने या प्रस्तावास विरोध दर्शवला होता. बैठकीचे आयोजन जानेवारीमध्येच करण्यात आले होते, मात्र पठाणकोटमधील हल्ल्यामुळे ती लांबणीवर टाकली. विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चा केवळ सीमाप्रश्नाशी संबंधित मुद्द्यांवर अभिप्रेत नाही. यामध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विकासावर एकसमान दृष्टिकोनाचे आदान-प्रदान करणे अपेक्षित मानले जाते. दोन्ही देशांमध्ये ४,०५७ किमी लांब सीमा आहे. चीन अरुणाचल प्रदेशमधील बहुतांश भाग असलेल्या २ हजार किमी क्षेत्रात वाद असल्याचे मानतो. मात्र, १९६२ च्या युद्धात चीनने बळकावलेल्या अक्सा चीनसह ४ हजार किमी क्षेत्राचा सीमावाद असल्याचे भारत मानतो.

पाककडून युद्धबंदीचे उल्लंघन
काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील शाहपूर भागात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मात्र, पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने पहिल्यांदा युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही पाकिस्तानने अशाच प्रकारे गोळीबार केला होता. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांच्या मते, सुमारे सहा महिन्यांनंतर पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदी करण्यात आली. यात सुरुवातीला छोट्या शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. मात्र, नंतर अत्याधुनिक शस्त्रे वापरण्यात आली. रविवारी सकाळी हा गोळीबार थांबला. त्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहीम राबवली. दरम्यान, सीमारेषेवरील सुरक्षाव्यवस्था आता अजूनही कडक करण्यात आली आहे.