आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Foreign Secretary First Visit After Pathankot Attacks

पाकिस्‍तानने भारताला डिवचले, बायलेटरल टॉकमध्‍ये मांडला कश्मीर-बलूचिस्तान मुद्दा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र सचिव एजाज अहमद चौधरी दिल्‍लीत पोहोचले असून, त्‍यांनी भारताचे परराष्‍ट्र सचिव एस. जयशंकर यांची भेट घेतली. पठाणकोट हल्‍ल्‍यानंतर दोन्‍ही देशाच्‍या परराष्‍ट्र सचिवांची ही पहिलीच भेट आहे.
काय झाली चर्चा
> पाक हायकमीशननुसार, एजाज यांनी भारताला म्‍हटले की जम्मू-कश्मीर कोर इश्यू आहे. हे प्रकरण यूएन सिक्युरिटी काउंसिल रेजोल्यूशननेच उपाय करावा.
> या शिवाय पाकिस्‍तानने बलूचिस्तानमध्‍ये अटक केलेल्‍या कुलभूषण जाधवचाही मुद्दा उपस्‍थ‍ित केला.
> शिवाय समझौता एक्‍स्‍प्रेसमध्‍ये ब्‍लास्‍ट प्रकरणातील आरोपींना सोडून द्यावे, असेही एजाज यांनी जयशंकर यांना म्‍हटले.
> दरम्‍यान, भारताने पठाणकोट हल्‍ल्‍याचा मास्टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरवर कडक कारवाई करण्‍याचा मुद्दा मांडला.
का आले चौधरी भारतात
> पाकिस्‍तानचे फॉरेन सेक्रेटरी एजाज अहमद चौधरी हे हार्ट ऑफ आशियाच्‍या कार्यालयीन बैठकीत सहभागी होण्‍यासाठी भारतात आलेत.
> या बैठकीत भाग घेतल्‍यानंतर ते आजच पाकिस्‍तानला परत जाणार आहेत.
> 25 डिसेंबर रोजी मोदी-नवाज शरीफ यांच्‍या भेटीनंतर दोन्‍ही देशांत ही पहिली ऑफिशियल्स भेट आहे.
> या भेटीमुळे रखडलेली शांतता चर्चा पुन्‍हा सुरू होण्‍याच्‍या आशा पल्‍लवीत झाल्‍या आहेत.
या मुद्दावर होऊ शकते चर्चा
> पठाणकोट हल्‍ल्‍याची चौकशी.
> बलूचिस्तान मुद्दा. काही दिवसांपूर्वी बलूचिस्‍तानमध्‍ये पाकिस्‍तानने भारताच्‍या एका अधिकाऱ्याला अटक केली.
> समझौता एक्‍स्‍प्रेस ब्लास्ट प्रकरण
>सीजफायर वॉयलेशन.
कॉंग्रेसने काय म्‍हटले ?
> या चर्चेला आमचा पाठिंबा आहे; पण भारताने स्‍पष्‍ट धोरण अवलंबवावे, अशी अपेक्षा कॉंग्रेसचे नेता आनंद शर्मा यांनी व्‍यक्‍त केली.
भारतीय अधिकारी काय म्‍हणतात ?
> या भेटीत दहशतवादाचा मुद्दा महत्‍त्‍वाचा असू शकतो, असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
> पठाणकोट हल्‍ल्‍याच्‍या चौकशीसाठी भारत एनआयए टीमला पाकिस्‍तानात पाठवण्‍याचा मुद्दा उपस्‍थ‍ित करू शकतो.