आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला दुसऱ्या लग्नाची परवानगी देऊ नका! आयटीबीपीचा जवानांच्या पत्नींना अनोखा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयटीबीपीने (इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस) आपल्या जवानांच्या पत्नींना एक अनोखा सल्ला दिला आहे. भारत-चीन सीमेवर तैनात या निमलष्करी दलातील जवानांच्या पत्नींनी पतीला दुसरा विवाह करू देऊ नये. पतीच्या रेजिमेंटचा क्रमांक, रँक, त्यांचे वेतन आणि पोस्टिंग कुठे आहे, याची सखोल माहिती या पत्नींनी ठेवावी, असाही सल्ला देण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर सरकार तुमच्या पतीला नेमक्या किती सुट्या देते याची माहितीही ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
 
पतीचे सर्व्हिस बुक, बँक खाते आणि विमा पॉलिसीमध्ये अवलंबित म्हणून आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घेण्यास आयटीबीपीने या पत्नींना सांगितले आहे. या सर्व सूचना देणाऱ्या ८५ हजार पुस्तिका आयटीबीपीने छापल्या असून जवानांना आरोग्य व स्वच्छतेविषयी माहिती देणाऱ्या पुस्तिकांसोबत ही नवी पुस्तिका देण्यात आली आहे. एवढेच नव्हे, आयटीबीपीचे महासंचालक कृष्णा चौधरी यांनी जवानांना सुटीवर गेल्यानंतर ही पुस्तिका पत्नीच्या हाती सोपवा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
 
... म्हणून पुस्तिका छापल्या
आयटीबीपीचे जवान दीर्घ काळ कुटुंब-घरापासून दूर असतात. सुटीतच घरी जातात. या काळात त्यांचे घर, कुटुंबाची जबाबदारी पत्नीवरच असते. मात्र, या जवानांना व कुटुंबीयांना त्यांच्या अधिकारांची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी या पुस्तिका छापल्या.
- विवेक पांडेय, प्रवक्ते, आयटीबीपी

पतीबाबत संशय वाटलातर अधिकाऱ्यांना सांगा
{ महिलांनी पतीला दुसऱ्या विवाहास परवानगी देऊ नये. एखाद्या जवानाने असा विवाह केलाच तो बडतर्फ होऊ शकतो.
{ सरकारी कर्मचाऱ्याने हुंडा मागणे बेकायदा आहे. शिक्षा होऊ शकते.
{ घटस्फोट हा कोणत्याही वादाचा शेवटचा पर्याय आहे. यासाठी महिला आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, पतीच्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर्स किंवा समुपदेशकांची मदत घेऊ शकतात.
{ पती कोणत्या कठीण परिस्थितीत ड्यूटीवर आहे ते महिलांनी ओळखावे. त्याला मदत करावी. मात्र, काही संशय वाटला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ कळवा.
बातम्या आणखी आहेत...